Home /News /national /

कॉलेजमधील मित्रानं केला घात! गुंगीचं औषध देत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लील VIDEO केला शूट

कॉलेजमधील मित्रानं केला घात! गुंगीचं औषध देत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लील VIDEO केला शूट

नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनीला खाण्यातून गुंगीच औषध देवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. (प्रातिनिधीक फोटो)

नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनीला खाण्यातून गुंगीच औषध देवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. (प्रातिनिधीक फोटो)

नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या एका विद्यार्थिनीला (Nursing student rape) खाण्यातून गुंगीच औषध देवून तिच्यावर बलात्कार (Rape by giving drugs) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    भोपाळ, 08 सप्टेंबर: नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या एका विद्यार्थिनीला (Nursing student rape) खाण्यातून गुंगीच औषध देवून तिच्यावर बलात्कार (Rape by giving drugs) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणानं हे विकृत कृत्य केलं आहे. हे प्रकरण एवढ्यावरच संपलं नाही तर, आरोपीनं पीडितेचे अश्लील व्हिडीओ (Obscene video) देखील शूट केले आहेत. यानंतर आरोपी अश्लील व्हिडीओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल (Blackmail) करत होता. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू आहे. संबंधित घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील आहे. तर गोविंद अहिरवार असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी अहिरवार आणि 26 वर्षीय पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी अहिरवार यानं 14 ऑगस्ट रोजी पीडितेला कॉलेजला सोडण्याचा बहाणा केला. कॉलेजचाच ओळखीचा मित्र असल्यानं पीडित तरुणीही त्याच्या गाडीत बसली. दरम्यान, आरोपीनं आपली कार थांबवून वाटेत असणाऱ्या एका भोजनालयातून खाण्यासाठी काही पदार्थ खरेदी केले. हे पदार्थ खाल्ल्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाली. हेही वाचा-पुणे हादरलं! बहिणीसोबत केलेल्या विकृत कृत्याचा भावानं घेतला फिल्मी स्टाइल बदला यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला आपल्या भाड्यानं राहत असलेल्या घरात घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर या गंभीर घटनेचा अश्लील व्हिडीओदेखील शूट केला. यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओच्या आधारे पीडित तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणी आपल्या आई वडिलांकडे अलीराजपूर येथे गेली आणि तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या पालकांना सांगितला. आरोपीनं जीवे मारण्याची आणि संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची देखील धमकी दिली आहे. हेही वाचा-एकटीला पाहून रुममध्ये शिरला अन्...; IPS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत कुकचं विकृत कृत्य घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या पालकांनी अलीराजपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पण संबंधित घटना भोपाळ येथील निशातपुरा याठिकाणी घडल्यानं हे प्रकरण निशातपुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन छापा टाकला असता, संबंधित आरोपी फरार असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असून घटनेचा तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rape

    पुढील बातम्या