मराठी बातम्या /बातम्या /देश /Remedisivir चोरलं आणि त्याऐवजी कोरोना रुग्णांना...; नर्सिंग स्टाफचा भलताच प्रताप उघड

Remedisivir चोरलं आणि त्याऐवजी कोरोना रुग्णांना...; नर्सिंग स्टाफचा भलताच प्रताप उघड

रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remedisivir Injections) काळाबाजार (Black Marketing) करताना दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता एक मोठा खुलासा झाला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remedisivir Injections) काळाबाजार (Black Marketing) करताना दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता एक मोठा खुलासा झाला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remedisivir Injections) काळाबाजार (Black Marketing) करताना दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता एक मोठा खुलासा झाला आहे.

  जयपूर, 18 मे :  एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने एकूण आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडस, औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले असून त्यांच्या या अडचणीचा गैरफायदा काळाबाजार करणारे घेत आहेत. कोरोनाच्या (Corona) संकटात औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राजस्थानमधील कोटा (Kota) इथं असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णांवर उपचाराकरिता उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remedisivir Injections) काळाबाजार (Black Marketing) करताना दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता एक मोठा खुलासा झाला आहे.

  या दोन्ही भावांपैकी एकाने दोन रुग्णांसाठी रेमडेसेवीरचं इंजेक्शन चोरलं आणि त्यानंतर रुग्णांना पाण्याचं इंजेक्शन टोचलं. जे औषध त्यांनी चोरलं होतं ते जादा दरानं विक्री करण्यासाठी आपल्या जवळ ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी या दोन्ही भावांकडून 2 इंजेक्शन्स जप्त केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे बुंदी जिल्ह्यातील निमोदा गावचे रहिवासी असून ते सख्खे भाऊ आहेत. हे दोघं सध्या महावीर नगरमध्ये राहत आहेत. या दोघांना 15 मे रोजी अटक करण्यात आली आहे. यातील मनोज हा पोलीस रिमांडमध्ये (Police Remand) असून दुसऱ्याला कारागृहात पाठवण्यात आलं आहे.

  हे वाचा - सिंगापूरहून येणारी विमानं थांबवा, मुलांना धोका; केजरीवालांची केंद्राला विनंती

  या प्रकरणाचा तपास करत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णुकुमार यांनी सांगितलं, मनोज रेगर कोटा हार्ट हॉस्पिटलमधील कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत होता. या रुग्णालयात भरती असलेल्या रतनलाल आणि माया नावाच्या दोन रुग्णांचे रेमडेसिवीर इंजेक्शन चोरल्याचं मनोज याने चौकशीदरम्यान कबूल केलं आहे. इंजेक्शन चोरल्यानंतर त्यात पाणी भरल्याचंही त्याने सांगितलं. मनोजचा भाऊ राकेश हा रुग्णालयाजवळील एका लॅबमध्ये नोकरी करतो. तो कोविड वॉर्डमधील रुग्णांचे सॅम्पल्स घेण्यासाठी रुग्णालयात येतो.

  हे वाचा - ...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू

  कोटा मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय सरदाना यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार आली होती. खासगी हॉस्पिटलमधील स्टाफ धोका देत रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती डॉ. सरदाना यांना मिळाली होती. यावर डॉ. सरदाना यांनी अटेंडंट असल्याचे भासवत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक ऑपरेशन राबवत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे.

  First published:

  Tags: Coronavirus