टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या त्या नर्सेसना अशी झाली शिक्षा

नवजात अर्भकांना ठेवण्यात येणाऱ्या अतिदक्षता विभागामध्ये टिकटॉक व्हिडिओ केल्याबद्दल चार नर्सेसना रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या टिकटॉक व्हिडिओमध्ये या नर्सेस नाचताना आणि गाताना दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 08:28 PM IST

टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या त्या नर्सेसना अशी झाली शिक्षा

मलकानगिरी (ओडिशा) 27 जून : नवजात अर्भकांना ठेवण्यात येणाऱ्या अतिदक्षता विभागामध्ये टिकटॉक व्हिडिओ केल्याबद्दल चार नर्सेसना रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओडिशामधल्या मलकानगिरी जिल्हा रुग्णालायामध्ये हा प्रकार घडला.

या टिकटॉक व्हिडिओमध्ये या नर्सेस नाचताना आणि गाताना दिसत आहेत. टिकटॉक हे छोटे म्युझिक व्हिडिओ बनवण्याचं एक अॅप आहे. नर्सेसनी, आपण कामाचे तास पूर्ण केल्यानंतर व्हिडिओ बनवला, असं म्हटलं आहे. पण त्यावेळी त्या युनिफॉर्ममध्ये होत्या आणि अशा प्रकारे टिकटॉक व्हिडिओ शूट करणं ही आमची चूक आहे हे मात्र त्यांनी कबूल केलं आहे.

मध्यरात्री बँकेचं दार उघडलेलं, पोलिसांचा गराडा आणि धक्कादायक खुलासा

ज्या नवजात अर्भकांना गंभीर स्वरूपाचे आजार झालेले असतात त्या अर्भकांना अशा प्रकारच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात येतं. इथे अर्भकांच्या आरोग्याची काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते. त्यांना कोणताही जंतूसंसर्ग होऊ नये याचीही खबरदारी घ्यावी लागते.

अशा स्थितीत ज्या नर्सेसनी या अर्भकांची काळजी घ्यायची त्या मोठमोठ्या आवाजात टिकटॉक व्हिडिओ करू लागल्या तर याला म्हणावं तरी काय, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Loading...

कमालीचा हलगर्जीपणा

रुबी रॉय, तापसी बिस्वास, स्वप्ना बाला आणि नंदिनी राय या चार नर्सेसनी अर्भकांच्या अतिदक्षता विभागात टिकटॉक व्हिडिओ केला. त्यावेळी त्या युनिफॉर्ममध्ये होत्या. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली.

जिल्हा न्यायदंडाधिकारी मनीष अगरवाल यांनी या चारही नर्सेसना रजेवर जाण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या नर्सेसनी आपल्या कामामध्ये कमालीचा हलगर्जीपणा केला आहे, असा शेरा मारत प्रशासनाने या नर्सेसना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

================================================================================

SPECIAL REPORT : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...