22 मार्च:एखादा सिनेकलाकार उपचारासाठी भरती झाला तर त्या हॉस्पीटलमध्ये लोकांची गर्दी होते. लोक फोटो काढतात ऑटोग्राफ घेतात .पण एखाद्या राजकीय नेत्यासाठी त्यातही गुन्हेगार म्हणून तुरूंगवास भोगणाऱ्या राजकीय नेत्यासाठी क्वचितच लोक फोटो ऑटोग्राफसाठी गर्दी करतात. पण चारा घोटाळ्यातील आरोपी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची बातच काही और आहे. त्यांच्यासोबत रूग्णालयातील नर्सेसनी फोटो काढले आहेत. गंमत म्हणजे हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत.
लालू प्रसाद यादव सध्या चारा प्रकरणी एका तुरूंगात शिक्षा भोगत आहेत.काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. म्हणून त्यांना रांचीच्या रिम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे कार्डिओलोजी विभागातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केल्यानंंतर तिथल्या नर्सेसला मोह अनावर झाला.
या सगळ्यांनी लालू प्रसाद यादवांसोबत फोटो काढले. गंमत म्हणजे रांची हे बिहारमध्ये नाही तर झारखंडमध्ये आहे. तर आपल्या शेजारच्या राज्यातही लालूंची क्रेझ संपत नाही हे स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Jharkhand, Lalu prasad yadav, Nurse