देशभरातील कोरोनाचे Latest Updates, जाणून घ्या तुमच्या राज्यात काय आहे परिस्थिती

देशभरातील कोरोनाचे Latest Updates, जाणून घ्या तुमच्या राज्यात काय आहे परिस्थिती

देशभरात रोज किमान हजारहून अधिक नवीन लोकांना संसर्ग होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मे : देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्याचा वेग मंदावला तरीही धोका कायम आहे. देशभरात रोज किमान हजारहून अधिक नवीन लोकांना संसर्ग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 35 हजारच्या वर पोहोचली आहे. शुक्रवारी देशभरात 77 रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 27, गुजरातमध्ये 17, पश्चिम बंगालमध्ये 11, मध्यप्रदेश-राजस्थान इथे प्रत्येकी 7, दिल्लीत 3 आंध्र आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी 2 तर कर्नाटकात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभऱता मृतांचा आकडा 1 हजार 152 वर पोहोचला आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सर्वाधिक महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये जास्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आणखीन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं शुक्रवारी लॉकडाऊनचा तीसरा टप्पा 17 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Disaster Management Act 2005 नुसार हा लॉकडाऊन वाढवला आहे. आता देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्याच बरोबर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनसाठीही केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 500हून अधिक आहे. त्यामध्ये मुंबईसह उपनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये 4721 तर दिल्लीत 3738 कोरोनाग्रस्तांचा आकडा आहे. रेड झोनमध्ये देशात 130 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये 284 आणि ग्रीन झोनमध्ये 319 जिल्हे आहेत.

हे वाचा-आधीच्या दोनपेक्षा तिसरा लॉकडाऊन वेगळा, 2 आठवडे 'या' गोष्टींवर पूर्ण बंदी

हे वाचा-Lockdown 3.0 ची घोषणा होताच लोक सर्च करतायत 'ही' माहिती

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 2, 2020, 7:50 AM IST

ताज्या बातम्या