NEET Result : मेडिकल विद्यार्थ्यांना 'ऑल द बेस्ट' ntaneet.nic.in इथे पाहा प्रवेशपरीक्षेचा निकाल

NEET Result : मेडिकल विद्यार्थ्यांना 'ऑल द बेस्ट' ntaneet.nic.in इथे पाहा प्रवेशपरीक्षेचा निकाल

NTA NEET 2019 Result : वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. मेडिकल एंट्रन्स टेस्टचा हा निकाल ntaneet.nic.in and mcc.nic.in या वेबसाइटवर अधिकृतपणे पाहता येईल.

  • Share this:

मुंबई, 5 जून : वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षेचा अर्थात NEET 2019 चा Result आज लागणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात 'National Testing Agency NTA'ने ही प्रवेश परीक्षा घेतली होती. 'NTA NEET 2019 Result'आज 'NTA'च्या वेबसाइटवर पाहता येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ntaneet.nic.in and mcc.nic.in या वेबसाइटवर लॉग-इन करावं, असं कळवण्यात आलं आहे.

देशभरात 5 मे रोजी NEET घेण्यात आली होती. फानी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या ओडिशा आणि कर्नाटकात मात्र 20 मे रोजी NEET परीक्षा घेण्यात आली. यापूर्वीच या प्रवेश परीक्षेची उत्तरं NEET Answer Key 2019 जाहीर करण्यात आली आहेत. त्यावरच्या आक्षेपांना 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता अंतिम निकाल आज लागणार आहे.

पाहा : VIDEO : अंबरनाथमध्ये रस्त्यावर कुत्रे आणि मांजरांच्या मृतदेहाचा खच!

नीट 2019 परीक्षा NEET 2019 EXAMसाठी एकूण 15 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील देशभरातील 14 लाख 10 हजार 754 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

पाहा :SPECIAL REPORT : नवरा-बायकोचं भांडणाला हिंसक वळण, दोन गावांनी फोडली एकमेकांची डोकी!

NEET Result 2019 कसा बघायचा?

1.प्रथम ntaneet.nic.in किंवा mcc.nic.in या वेबसाइटला भेट द्या.

2.डाउनलोड टॅबमध्ये download NEET Result 2019 जाऊन क्लिक करा.

3.नव्या विंडोमध्ये आवश्यक माहिती भरा. उदाहरणार्थ - आपला आयडी आणि पासवर्ड

4.ही माहिती भरल्यानंतर लगेच तुमचा NTA NEET Result 2019 स्क्रीनवर झळकेल.

आरोग्यसेवा संचालनालयाने दिलेल्या सूचनेनुसार या प्रवेशपरीक्षेची मेरिट लिस्ट काढण्यात येईल. SC, ST विद्यार्थ्यांना किमान 40 गुण अनिवार्य आहेत. इतरांसाठी किमान गुण 50 पर्सेंटाइल असणं बंधनकारक आहे.

SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीला किती खर्च झाला तुम्हाला माहिती आहे का?

First published: June 5, 2019, 6:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading