मराठी बातम्या /बातम्या /देश /

NT पुरस्कार 2020 : नेटवर्क-18 च्या न्यूज चॅनल्सचा दबदबा; 21 पुरस्कारांनी सन्मानित

NT पुरस्कार 2020 : नेटवर्क-18 च्या न्यूज चॅनल्सचा दबदबा; 21 पुरस्कारांनी सन्मानित

न्यूज इंडस्ट्रीमध्ये एनटी पुरस्कार मानाचा समजला जातो.

न्यूज इंडस्ट्रीमध्ये एनटी पुरस्कार मानाचा समजला जातो.

न्यूज इंडस्ट्रीमध्ये एनटी पुरस्कार मानाचा समजला जातो.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : प्रसिद्ध न्यूज टेलिविजन NT अवाॅर्ड्समध्ये (NT Awards) न्यूज 18 लोकमतने (News18 Lokmat) तीन विभागात पुरस्कार पटकावले आहे. न्यूज इंडस्ट्रीमध्ये एनटी पुरस्कार मानाचा समजला जातो. यामध्ये न्यूज 18 लोकमतसह News18 च्या अनेक भाषांतील चॅनलला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. यामध्ये न्यूज18 लोकमतला बेस्ट प्रोमो फॉर चॅनल कॅटेगरीमध्ये 'इलेक्शन अँकर प्रोमा' ला पुरस्कार मिळाला आहे. तर न्यूज 18 लोकमतवरील प्रसिद्ध शो 'जगाच्या पाठीवर' या कार्यक्रमाच्या प्रोमोला आणि 'आरे वाचवा' या कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट व्हिडीओ एडिटर म्हणून प्रसाद मिस्त्री यांना पुरस्कार देण्यात आला आहे. न्यूज टेलीविजन अवॉर्ड्स 2020 मध्ये नेटवर्क-18 ने एकूण 21 पुरस्कार पटकावले आहेत. इंग्रजी न्यूज चॅनल CNN-News18 च्या ज़का जॅकबला सर्वोत्कृष्ट टीवी न्यूज प्रेजेंटर म्हणून तर CNBC News18 चे शिरीन भान यांना सर्वोत्कृष्ट बिजनेस न्यूज अँकरला (इंग्रजी) गौरविण्यात आलं आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट प्रोमो कॅम्पेनसाठी  #IndiaStayHome ला पुरस्कार मिळाला आहे.  बेस्ट अँटन्टेनमेंट टॉक शोसाठी Bollywood Roundtable ला पुरस्कृत करण्या आलं आहे. बेस्ट न्यूज डिबेट शोचा पुरस्कार News Epicentre यांनी जिंकला आहे. बेस्ट प्रोमो शो पॅकेजिंगसाठी Battle For Delhi ला पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बेस्ट टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन या न्यूज टेलिविजन कॅटेगरीमध्ये Corona Wall ला पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय विविध विभागात मिळालेले पुरस्कार 1. बेस्ट डेली न्यूज बुलेटिन (उड़िया): न्यूज18 उड़िया - अमारी उड़ीसा 2. लाइफस्टाइल आणि फॅशन न्यूज शो (इंग्रजी ): सीएनबीसी-टीवी18 - हाई लाइफ 3. बेस्ट अँटन्टेनमेंट टॉक शो (इंग्रजी): सीएनएन न्यूज18 - द बॉलीवुड राउंडटेबल 4. बेस्ट बिजनेस न्यूज प्रोग्राम (इंग्रजी): सीएनबीसी-टीवी18 - रीस्टार्टिंग इंडिया 5. बेस्ट न्यूज डिबेट शो (इंग्रजी): सीएनएन न्यूज18 - न्यूज एपिसेंटर 6. बेस्ट प्राइम टाइम न्यूज शो (उड़िया): न्यूज18 उड़िया - फोकस पॉइंट 7. बेस्ट टीवी न्यूज प्रेजेंटर (इंग्रजी): सीएनएन न्यूज18 - ब्रास टॅक्स के लिए जका जैकब 8. बेस्ट टीवी न्यूज रिप्रेजेंटर (उड़िया): न्यूज18 उड़िया - बंदिता मोहापात्रा- अंफान साइक्लोन अपडेट 9. बेस्ट बिजनेस न्यूज एंकर (इंग्रजी): सीएनबीसी-टीवी18 - शिरीन भान 10. बेस्ट व्हिडीओ एडिटर (मराठी): न्यूज18 लोकमत - प्रसाद मिस्त्री- आरे वाचवा शो 11. बेस्ट मार्केटिंग इनीशेटिव (इंग्रजी): #CNBCTV18Tweetathon 12. बेस्ट मार्केटिंग इनीशेटिव (हिंदी): दिवाली धमाका कॉन्टेस्ट 13. बेस्ट ग्राउंड वा वर्चुअल ईवेंट इनीशिएटिव (हिंदी): न्यूज18 इंडिया - सास बहु और देवरानी स्टरडम अवॉर्ड्स 14. बेस्ट प्रोमो कँम्पेन (इंग्रजी): सीएनएन न्यूज18 - #IndiaStayHome 15. बेस्ट प्रोमो फॉर चॅनल (हिंदी): न्यूज18 इंडिया - वोट कर 16. बेस्ट प्रोमो फॉर चॅनल (इंग्रजी): सीएनबीसी-टीवी18 - शेफ लीडरशिप प्रोमो 17. बेस्ट प्रोमो फॉर चॅनल (मराठी): न्यूज18 लोकमत - इलेक्शन एंकर प्रोमो 18. बेस्ट प्रोमो फॉर शो (मराठी): न्यूज18 लोकमत - जगाच्या पाठीवर 19. बेस्ट प्रोमो शो पॅकेजिंग (इंग्रजी): सीएनएन न्यूज18 - बैटल फॉर दिल्ली (चुनाव परिणाम के दिन) 20. बेस्ट टेक्नोलॉजिकल इनोवेशन इन न्यूज टेलीविजन (इंग्रजी): सीएनएन न्यूज18 - कोरोना वॉल 21. बेस्ट एडिटोरियल टीम ऑफ न्यूज चॅनल (इंग्रजी): सीएनबीसी-टीवी18 यंदा न्यूज टीवी अवाॅर्ड्समध्ये 120 पुरस्कार विविध मीडिया समूह आणि मीडिया व्यक्तींना देऊन त्यांना गौरविण्यात आलं.
First published:

पुढील बातम्या