अजित डोवल यांचा नवा प्लॅन, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी काश्मीरमध्ये मोहीम

अजित डोवल यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असं असलं तरी काश्मीरमधल्या लोकांना त्रास दिला जाऊ नये, असंही डोवल यांनी निक्षून सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 08:18 PM IST

अजित डोवल यांचा नवा प्लॅन, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी काश्मीरमध्ये मोहीम

श्रीनगर, 26 सप्टेंबर : काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी काही दिवस काश्मीरमध्येच राहून सुरक्षेचा बंदोबस्त केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा दौरा केला.काश्मीरमधल्या सामान्य माणसांचं जीवन सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. डोवल यांनी काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आता दहशतवाद्यांच्या विरोधातली मोहीम आणखी तीव्र केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

30 ऑक्टोबरला काश्मीरचं विभाजन

काश्मीरचं विभाजन झाल्यानंतर आता 30 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार आहेत. त्याच दिवशी दोन्ही उपराज्यपालांचाही शपथविधी आहे.

काश्मीरमधल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासोबतच काश्मीरमधून होणाऱ्या सफरचंदाची निर्यातीसाठी विशेष योजना तयार करण्यात आल्या आहेत.

अजित डोवल यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असं असलं तरी काश्मीरमधल्या लोकांना त्रास दिला जाऊ नये, असंही डोवल यांनी निक्षून सांगितलं.

Loading...

दहशतवाद्यांच्या धमक्या

दहशतवादी नागरिकांना आणि सफरचंद उत्पादकांना धमक्या देत आहेत आणि सक्तीने संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण करत आहेत याची त्यांनी जाणीव करून दिली.

काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर अजित डोवल यांनी 11 दिवस काश्मीरमध्येच तळ ठोकला होता. त्या दिवसांत इथे हिंसा होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली.

नियंत्रण रेषेच्या जवळची सुरक्षा दलं आणि काश्मीरच्या आतल्या भागातले सुरक्षा कर्मचारी यांच्यात ताळमेळ कायम राहावा यासाठीही ते दक्ष होते.

==================================================================================

मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे हाल; घरांमध्ये चिखल आणि पाण्याचं साम्राज्य, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 08:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...