मराठी बातम्या /बातम्या /देश /

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही आहेत शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे चाहते, म्हणाले...

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही आहेत शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे चाहते, म्हणाले...

अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण देत त्यांच्या नेतृत्वक्षमतेचं कौतुक केलं आहे.

अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण देत त्यांच्या नेतृत्वक्षमतेचं कौतुक केलं आहे.

अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण देत त्यांच्या नेतृत्वक्षमतेचं कौतुक केलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 5 मार्च : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल हे सुरक्षाविषयक आपल्या विशेष रणनीतीसाठी ओळखले जातात. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेलं प्रत्युत्तर असो किंवा कलम 370 रद्द केल्यानंतर अजित डोवाल यांनी हाताळलेली परिस्थिती असो... याबाबत केंद्र सरकार नेहमी त्यांच्यावर खूष असल्याची नेहमीच चर्चा असते. याच अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण देत त्यांच्या नेतृत्वक्षमतेचं कौतुक केलं आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचं उत्तम उदाहरण होते,' असं म्हणत अजित डोवाल यांनी महाराजांच्या खान भेटीचं उदाहरण दिलं आहे. प्रतापगडावरील त्या भेटीत शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता. त्यानंतर सय्यद बंडा शिवाजी महाराजांवर वार करण्यास धावला. मात्र त्याचवेळी जिवा महाला या महाराजांच्या मावळ्याने दांडपट्टा चालवत सय्यद बंडावर वार केला होता. या जिवा महालाला शिवाजी महाराजांनी आधी वाटेवरून जाताना दांडपट्टा चालवताना पाहिलं होतं. तेव्हाच त्याची आपल्या सैनात निवड केली आणि त्याला आणखी चांगलं प्रशिक्षण देत त्याच्या कौशल्यात भर टाकली. हे सगळं उदाहरण देत अजित डोवाल यांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणाचं कौतुक केलं आहे.

कोण आहेत अजित डोवाल?

राष्ट्रीय सुरक्षेमध्ये अजित डोवल यांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना मागील वर्षी केंद्र सरकारने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला. 2014मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अजित डोवल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड करण्यात आली. पाच वर्षाच्या कार्यकाळात डोवल यांनी अनेक प्रश्न यशस्वीरित्या हाताळले. त्यामुळे त्यांची कामगिरी पाहता त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी पुढील पाच वर्षासाठी नेमण्यात आलं.

हेही वाचा-निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीची तारीख ठरली; चौथ्यांदा जारी केलं डेथ वॉरंट

एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका

2016मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला होता. शिवाय, पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर देखील भारतानं बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. एअर स्ट्राईकमध्ये देखील अजित डोवल यांची भूमिका महत्त्वाची होती.

हिंसाचारानंतर दिल्लीतील रस्त्यांवरही उतरले अजित डोवाल

काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत हिंसाचार झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हिंसाचारग्रस्त भागात दाखल झाले होते. त्यांनी कारमध्ये बसून सीलमपूर, भजनपुरा, मौजपूर, यमुना विहार यासारख्या हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पोलीस आयुक्तांसह सीपी, डीसीपी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती.

First published:

Tags: Ajit Doval, NSA