मोदींच्या जेम्स बॉण्डची ताकद आणखी वाढली; दिला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा!

मोदींच्या जेम्स बॉण्डची ताकद आणखी वाढली; दिला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा!

Ajit Doval : अजित डोवल यांची ताकद ही पहिल्यापेक्षा देखील वाढली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 जून : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास कायम असल्याचं दिसून आलं आहे. कारण, अजित डोवल यांची पुन्हा एकदा पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय, त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची ताकद ही पहिल्यापेक्षा देखील वाढली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेमध्ये अजित डोवल यांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. 2014मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अजित डोवल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड करण्यात आली. पाच वर्षाच्या कार्यकाळात डोवल यांनी अनेक प्रश्न यशस्वीरित्या हाताळले. त्यामुळे त्यांची कामगिरी पाहता त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी पुढील पाच वर्षासाठी नेमण्यात आलं.

मालेगाव बॉम्बस्फोट : साध्वी प्रज्ञा हाजीर हो; NIA कोर्टाचे आदेश

एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका

2016मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला होता. शिवाय, पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर देखील भारतानं बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. यामध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. एअर स्ट्राईकमध्ये देखील अजित डोवल यांची भूमिका महत्त्वाची होती.

एस. जयशंकर यांच्याकडे देखील जबाबदारी

दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून देखील नेमणणूक करण्यात आली आहे. सुब्रमण्यम जयशंकर यांचा गाढा अनुभव बघता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

इंदिरा गांधींच्या पुतळ्याला घातला बुरखा; काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

डोकलामचा तिढा सोडवला

एस. जयशंकर जेव्हा परराष्ट्र सचिव होते तेव्हा त्यांनी अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांशी राजनैतिक संबंधांवर पकड मिळवली होती. चीन आणि भारत यांच्या परस्पर संबंधांमध्ये गेल्या काही काळात अनेक चढउतार पाहायला मिळाले. त्यावेळी डोकलाम प्रश्नासारखा अवघड तिढाही जयशंकर यांनी मुत्सद्दीपणे सोडवला. भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

प्रभावी परराष्ट्र धोरण

अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांची ज्याला उत्तम जाण आहे अशी व्यक्ती मंत्रिमंडळात आल्यामुळे मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण आणखी प्रभावी ठरणार आहे. नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत भारत आणि जपानच्या संबंधांमध्ये नवं पर्व सुरू झालं. मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यामध्ये मैत्रीचं नातं विकसित होण्यातही जयशंकर यांचं योगदान मोठं आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी साधु- संतांची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

नरेंद्र मोदींवर प्रभाव

2015 ते 2018 या काळात एस. जयशंकर परराष्ट्र सचिव होते. त्यावेळी जयशंकर यांची बुद्धिमत्ता, अनुभव, त्यांची कार्यशैली यामुळे पंतप्रधान नरेद्र मोदी प्रभावित झाले. 2018 मध्ये ते निवृत्त झाले त्यावेळीही भारत सरकार वेळोवेळी त्यांचा सल्ला घेत असे. निवृत्त झाल्यानंतर एस. जयशंकर हे टाटा अँड सन्समध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते.आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

VIDEO : सुशीलकुमार शिंदे ते सलमान खान...बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला दिग्गजांची हजेरी

First published: June 3, 2019, 2:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading