12 जानेवारी : आज पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी असल्यानं त्र्यंबकेश्वरला निवृतीनाथ महाराजांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशहुन दोनशेहुन अधिक दिंडया आणि लाखोंच्या संख्येनं वारकरी काल रात्रीच त्रंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.
टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने त्र्यम्बकनगरी दुमदूमुन गेली असून वातावरण भक्तिमय झालेलं पहायला मिळतं.
या उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजोफाटा तैनात करण्यात आला असून पंढरपुरच्या धर्तीवर यंदापासून निवृत्तीनाथ यात्रेत निर्मल अभियान राबविणयात येणार आहे. त्यासाठी 64 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आज पहाटे ५ वाजता नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्निक निवृत्तीनाथांची विधिवत पद्धतीनं महापूजाही पार पडली. त्याचबरोबर शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी इथं हजेरी लावली होती.
त्याचबरोबर महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे दैवत असलेले श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेसाठी कर्नाटक, आंध्रप्रदेशासह महाराष्ट्रातील भावीक येत असतात. देशभरात प्रसिद्ध असलेल्या गड्डायात्रेची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात भक्तीमय वातावरण झालं आहे.
उद्या सकाळी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची पूजा करुन मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू यांच्या मठातून मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, Karnataka, Nrittinath maharaj, Siddheshwar Maharaj, Trimbakeshwar, Yatra start, आंध्र प्रदेश, कर्नाटक, त्र्यंबकेश्वर, निवृतीनाथ महाराज, यात्रा, सिद्धेश्वर महाराज