धक्कादायक! आमदारासह कुटुंबातील 11 जणांची एकाच वेळेस निर्घृण हत्या

धक्कादायक! आमदारासह कुटुंबातील 11 जणांची एकाच वेळेस निर्घृण हत्या

नॅशनल पीपल्स पार्टी (NNP)चे आमदार तिरोंग अबो यांच्यासह 11 जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अबो हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत होते.

  • Share this:

इटानगर(अरुणाचल प्रदेश), 21 मे : एका आमदारासह 11 जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अरुणाचल प्रदेशच्या तिरापमध्ये ही घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांकडून 11 जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

नॅशनल पीपल्स पार्टी (NNP)चे आमदार तिरोंग अबो यांच्यासह 11 जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अबो हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत होते. त्यांचीही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अबो हे अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम मतदारसंघातून आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी आमदार तिरोंग अबो आणि त्यांच्या घरच्यांवर हल्ला केला. सर्वात आधी हल्लेखोरांनी अबो यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीय आणि सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे.

नागा बंडखोर संघटनेने हा हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नागालँड (एनएससीएन) असं या संघटनेचं नाव आहे.

या घटनेनंतर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी यावर संताप आणि शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

VIDEO: उद्धव ठाकरेंची प्रताप सरनाईकांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 04:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading