भारताने एफ-16 ला पाडल्यानंतर पाकची घाबरगुंडी, एअरपोर्ट केलं बंद

भारताने एफ-16 ला पाडल्यानंतर पाकची घाबरगुंडी, एअरपोर्ट केलं बंद

भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेवर आगळीक सुरू केली आहे. भारतीय हद्दीत विमान घुसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकच्या एफ 16 विमानाला भारताने पाडलं. त्यानंतर आता पाकिस्तानने त्यांची सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द केली आहेत.

पाकिस्तानातील लाहोर, मुलतान, फैजलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद येथील विमानतळांवरून होणारी विमान उड्डाणे रद्द केली आहेत. दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले आहे.



पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या १३ व्या दिवशी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यात सुमारे ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.

इंडिगो, गो एअर कंपनीच्या विमानांना पुन्हा दिल्ला विमानतळावर पाठवण्यात आले आहेत. तसेच लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांना उड्डाण भरण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाचं एक विमान जम्मू काश्मीरमधील बडगाम इथं कोसळलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

सीमेवर गोळीबार

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. म्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

Army 'इन अॅक्शन', पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे.

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

' आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,' असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे.

Breaking: भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या