आरबीआयने व्याजदर वाढवल्यानंतर आता ईएमआयवर एवढी रक्कम वाढणार !

आरबीआयने व्याजदर वाढवल्यानंतर आता ईएमआयवर एवढी रक्कम वाढणार !

रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्के केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा ईएमआयचा हफ्ता जास्त भरावा लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 06 जून : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चार वर्षांनंतर प्रथमच व्याजदर 0.25 टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्के केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा ईएमआयचा हफ्ता जास्त भरावा लागणार आहे. बँकेच्या या निर्णयाचा मोठा फटका कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्यांवर होणार आहे.

रिव्हर्स रेपो दर 4 टक्क्यांनी 6 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. हा निर्णय सर्वसामान्यांना मोठा धक्का बसवणार आहे. रेपो रेट वाढवल्यामुळे आता गृह आणि कारच्या कर्जावरील ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2014 नंतर प्रथमच रेपो दरात ही वाढ केली आहे.

एवढ्या रुपयांनी वाढेल तुमचा ईएमआय...

जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं तर प्रत्येक महिन्याला ईएमआय 476 रुपयांनी वाढू शकेले. त्यामुळे तुम्हाला या कर्जावरील एकूण रक्कम 1,14,240 रुपये इतकी द्यावी लागेल.

याच पद्धतीने जर तुम्ही 5 वर्षांपर्यंत 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर ईएमआय प्रत्येक महिन्याला 123 रुपयांनी वाढेल. त्यामुळे कर्जाची एकूण 7380 रुपये इतकी द्यावी लागेल.

हेही वाचा...

आरबीआयचं पतधोरण जाहीर, रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ, कर्ज महागलं

First published: June 6, 2018, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading