काऊंटरवर काढलेलं रेल्वे तिकीट घरी बसून करता येतं रद्द, 'असा' मिळेल रिफंड

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन (IRCTC )नं प्रवाशांच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या गोष्टी सुरू केल्यात.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 05:24 PM IST

काऊंटरवर काढलेलं रेल्वे तिकीट घरी बसून करता येतं रद्द, 'असा' मिळेल रिफंड

मुंबई, 18 एप्रिल : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन (IRCTC )नं प्रवाशांच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या गोष्टी सुरू केल्यात. पहिल्यांदा रेल्वे काऊंटरवर बुक केलेलं तिकीट रद्द करण्यासाठी काऊंटरवर जावं लागायचं. पण आता तुम्ही घरी बसूनही करू शकता. IRCTC नं काऊंटर, स्टेशन, रिझर्व्हेशन आॅफिस, बुकिंग आॅफिस इथे बुक केलेलं तिकीट रद्द करण्याची सुविधा दिलीय. ही सेवा www.irctc.co.in वर मिळेल.


रेल्वे तिकीट रद्द केलं तर चार्ज लागतो. जाणून घेऊया पूर्ण प्रक्रिया

1. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर www.irctc.co.in तुम्ही लाॅग इन करा. त्यानंतर होमपेजवर ट्रेन आॅप्शनवर कर्सर आणा. आता कर्सरला ड्राॅप मेन्यूमध्ये कॅन्सल तिकिटावर आणा. आता काऊंटर तिकिटावर क्लिक करा.

2. काऊंटर तिकिटावर क्लिक करा, मग नवं पेज ओपन होईल. इथे PNR नंबर आणि ट्रेन नंबर लिहा. कॅप्चा भरा. मग चेक बाॅक्सला कन्फर्म करा. मग सबमिटवर क्लिक करा.

Loading...

3. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाइलवर OTP येईल. हा तोच नंबर जो बुकिंगच्या वेळी मिळालेला. मग सबमिटवर क्लिक करा.


4. OTP व्हॅलिड झाला की PNRचे डिटेल्स स्क्रीनवर दिसतील.

5. पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पूर्ण कॅन्सलेशनसाठी कॅन्सल तिकिटावर क्लिक करा. त्यानंतर रिफंड अमाऊंट स्क्रीनवर दिसेल. युजरला एक SMS येईल. त्यात PNR आणि रिफंडची माहिती मिळेल.

कसा मिळेल रिफंड?

कॅन्सल तिकिटाचा रिफंड इंडियन रेल्वेच्या PRS काऊंटरवर तिकीट जमा केल्यावर मिळेल. नियमानुसार रिफंड मिळेल.


VIDEO: प्रचारामुळे मुलांची भेटच नाही झाली- पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...