जगप्रसिद्ध ताज महल आता आग्र्यामध्ये असणार नाही!

ताज महल कुठे आहे असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे उत्तर आग्रा असे दिले जाते. पण...

  • Share this:

लखनऊ, 18 नोव्हेंबर: जगातील सात अश्चर्यांपैकी एक असलेले ताज महल पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. ताज महल कुठे आहे असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे उत्तर आग्रा असे दिले जाते. जगप्रसिद्ध असेलल्या या वास्तूबद्दल ही माहिती सर्वांनाच माहिती आहे. अगदी शाळेतील मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना याचे उत्तर बिनचूक माहित असते. पण तुम्ही देत असलेले हे उत्तर यापुढे मात्र बिनचूक असेलच असे नाही. होय यापुढे ताज महल आगा येथे असणार नाही.

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि मुगलसरायचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय नगर असे केले होते. आता ताज महल ज्या आग्रा शहरात आहे त्या शहराचे नाव बदलले जाणार आहे. योगी सरकार आग्रा शहराचे नाव बदलून अग्रवन करण्याचा विचार करत आहे. राज्यातील भाजप सरकारने आग्रा येथील आंबेडकर विद्यापीठाला यासंदर्भात ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकण्यास सांगितले आहे. सरकारच्या या विनंतीवर विद्यापीठातील इतिहास विभाग या प्रस्तावावर अभ्यास करणार आहे.

विद्यापीठातील डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक सुगम आनंद यांनी IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. आम्हाला यासंदर्भात राज्य सरकारकडून पत्र मिळाले आहे. आग्रा शहर अन्य कोणत्या नावाने ओळखले जात होते याचा अभ्यास करण्यास राज्य सरकारने सांगितले आहे. यासंदर्भातील अभ्यास आम्ही सुरु केला असून राज्य सरकारच्या पत्राला लवकरच उत्तर देऊ. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आग्रा शहराचे नाव अग्रवन असे ठेवण्याची योगी सरकारची योजना आहे. काही इतिहासकारांच्या मते ताज महलासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचे मुळ नाव अग्रवन असेच होते.

आता राज्य सरकारच्या या प्रस्तावानंतर इतिहास विभाग याचा अभ्यास करत आहे की कोणत्या परिस्थितीत अग्रवनचे नाव आग्रा असे करण्यात आले. भाजपचे आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी मुख्यमंत्री योगी यांना पत्र लिहून शहराचे नाव बदलण्याचा आग्रह केला होता.

अर्थात या नाव बदलण्याच्या प्रस्तावानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. जे लोक आग्र्याचे नाव अग्रवन करण्याच्या बाजूने आहेत, ते या प्रस्तावावर आनंदी आहेत. पण काहींच्या मते या शहराचे नाव मुगल सम्राट अकबरच्या नावावरून अकबराबाद असे ठेवले जावे. कारण अकबरानेच या शहराला मुगल साम्राज्याची राजधानी केले होते. योगी सरकारच्या या प्रस्तावावर पर्यटन व्यवसाय करणाऱ्या राकेश तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली. जगभरात आग्र्याची ओळख ताज महलाचे शहर अशी केली जाते. त्यामुळे शहराचे नाव बदलणे योग्य होणार नाही.

First published: November 18, 2019, 5:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading