हिमाचल प्रदेशमधल्या मनाली इथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल रोहतांग बोगद्याचं (Atal Rohtang Tunnel) उद्घाटन झाले. या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांचं भाषण सुरू असतांनाच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला चक्कर आली. पंतप्रधानांचं त्याकडे लक्ष जाताच त्यांनी आपलं भाषण मध्ये थांबवत महिला पोलिसाला खुर्चीवर बसविण्यास सांगितले. आणि आपल्या सोबत आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला उपचार करण्याची सूचना केली. यानंतर त्यांनी पुन्हा आपलं भाषण सुरू केलं. कामाच्या ताणामुळे त्यांना चक्कर आली असावी असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. हा बोगदा म्हणजे केवळ बोगदा नसून हिमालयातील इतक्या उंच ठिकाणी अस्तित्वात आलेलं एक स्वप्नच आहे असं सजलं जातं. लाहौल खोऱ्याला जीवनदान देणारा असा बोगदा तयार करता येऊ शकेल असा कुणी विचारही केला नसेल. आतापर्यंत थंडीचे 6 महिने होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौलच्या परिसराचा देशाशी संपर्क तुटलेला असायचा. पण आता या बोगद्यामुळे हा भाग देशाशी 12 महिने संपर्कात राहणार आहे.Inaugurating the spectacular #AtalTunnel. https://t.co/Npiw0qSO5A
— Narendra Modi (@narendramodi) October 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM narendra modi