आता सेट-टॉप बॉक्स न बदलता आॅपेरटर बदलू शकता!

आता सेट-टॉप बॉक्स न बदलता आॅपेरटर बदलू शकता!

1 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना आवडीचे चॅनल निवडता येणार असून त्या चॅनलसाठीच शुल्क भरावा लागणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी : तुम्ही केबल ऑपरेटर किंवा डीटीएच सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या मनमानीला कंटाळला असाल तर तुमचे आता 'अच्छे दिन' येणार आहे. कारण लवकरच मोबाईल फोनच्या क्रमांकाप्रमाणे तुम्हाला सेट-टॉप बॉक्सच्या पोर्टेबिलिटीचा पर्याय मिळणार आहे. याचा अर्थ सेट-टॉप बॉक्स न बदलता तुम्ही ब्रॉडकास्टर बदलू शकता.

टेलिफोन रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नव्या नियमावली संदर्भातले संकेत दिले आहेत.

वर्षाअखेरीस ग्राहकांना या नव्या नियमाचा लाभ घेता येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, 1 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना आवडीचे चॅनल निवडता येणार असून त्या चॅनलसाठीच शुल्क भरावा लागणार आहे. ट्रायनं ग्राहकांच्या हिताचा या नियम लागू केल्यानंतर आता सेट-टॉप बॉक्स पोर्टेबिलिटीच्या नियमांसदर्भात तयारी सुरू केली आहे.

तर दुसरीकडे, डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आणि केबल ऑपरेटर्सनी आत्तापासूनच या नियमाचा विरोध करायला सुरूवात केली आहे.

===========

First published: January 27, 2019, 11:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading