खूशखबर, आता मोबाईलवरून भरा टोल!

खूशखबर, आता मोबाईलवरून भरा टोल!

मोबाईलला प्रीपेड वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा बँकेचे खाते जोडल्यास ही सुविधा मिळू शकेल. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहन जाताच संबंधितांच्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा होईल.

  • Share this:

21 एप्रिल : राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर असून, यापुढे त्यांना टोल भरण्यासाठी रखडण्याची आवश्यकता भासणार नाही. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरण्यासाठी लवकरच न थांबता टोल भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे टोल भरण्यासाठी लागणारा वेळ वाचण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांतच मोबाईलवरून टोल भरण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. मोबाइलला प्रीपेड वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा बँकेचे खाते जोडल्यास ही सुविधा मिळू शकेल. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहन जाताच संबंधितांच्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा होईल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोठेही थांबण्याची आवश्यकता भासणार नाही.

First published: April 21, 2018, 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading