Home /News /national /

आता सायबर क्राईमचाही धोका, पैस दिले नाही तर कोरोना पसरवण्याची दिली जातेय धमकी

आता सायबर क्राईमचाही धोका, पैस दिले नाही तर कोरोना पसरवण्याची दिली जातेय धमकी

सध्या मोठ्या संख्येने सायबर क्राईमच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे सावधान राहणे गरजेचे आहे

    नवी दिल्ली, 26 मार्च :  कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) भीतीने सायबर गुन्हेगाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कधी ते डब्ल्यूएचओ अधिकारी (WHO) असल्याचे सांगून लोकांची फसवणूक केली जात आहे, तर कधी कोविड -19 (Covid - 19) च्या नावावर बनावट वेबसाइट्स तयार करून लोकांना फसवलं जात आहे. आता त्यांना एक नवीन मार्गही सापडला आहे. ब्रिटीश सुरक्षा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपनी सोफोसच्या अहवालानुसार, सायबर गुन्हेगार धमकी देणारा ई-मेल पाठवत आहेत. जर वापरकर्त्याने पैसे दिले नाही तर ते कोरोना विषाणूमुळे वापरकर्त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी संपर्कात येतील, अशी धमकी दिली जात आहे. संबंधित - मोदी सरकारचं योग्य दिशेने पहिलं पाऊल, राहुल गांधींकडून मोदींचं कौतुक 'पैसे न दिल्यास कोरोना घ्या' आतापर्यंत, जगभरात फसवणुकीसाठी अशा स्वरुपाच्या ईमेल वापरल्या जात आहेत. वापरकर्त्याची काही आक्षेपार्ह छायाचित्रे आमच्याकडे असून जर वापरकर्त्याने त्याला पैसे दिले नाहीत तर ती छायाचित्रे त्याच्या कुटुंबीयांसह आणि जगभरातील लोकांना पाठविली जातील, असं फसवणूक करणाऱ्याकडून सांगितले जात होते. परंतु आता नव्या ट्रेंडमध्ये फसवणूक करणार्‍यांनी कोरोना विषाणूची भीतीच आपले साधन बनवले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना विषाणूची लागण करू, अशी धमकी दिली जात ​​आहे. ईमेलमध्ये वापरकर्त्याला त्याचा जुना पासवर्डही सांगितला जात आहे. फसवणूक करणारे असा दावा करतात की त्यांना वापरकर्त्याचे सर्व पासवर्ड माहित आहेत आणि ते बर्‍याच काळापासून वापरकर्त्यावर नजर ठेऊन आहेत. संबंधित - संजय राऊतांचा 'तो' व्हिडीओ पाहून काय म्हणाले नितेश राणे, केली खोचक टीका एखादा ईमेल तुमच्याकडे आला तर काय करालं? आपल्याकडे असे कोणतेही ईमेल आल्यास घाबरू नका. गेल्या काही वर्षात झालेल्या डेटा लीकमध्ये आपला पासवर्ड समोरच्या व्यक्तीला कळू शकण्याची शक्यता आहे. संशोधन शास्त्रज्ञ पॉल डकलिन म्हणाले, "पैसे पाठवू नका." हे सर्व खोटे आहे. त्यांच्याकडे आपला कोणताही डेटा नाही. जर तुम्ही पैसे दिले तर तुमच्यावर ते नजर ठेवून राहतील व पुन्हा फसवतील.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या