आता घरात बसून सोडवा परीक्षेचे पेपर; विद्यार्थ्यांसाठी भाजप सरकारचा मोठा निर्णय

आता घरात बसून सोडवा परीक्षेचे पेपर; विद्यार्थ्यांसाठी भाजप सरकारचा मोठा निर्णय

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

  • Share this:

इंदूर, 27 जुलै : मध्य प्रदेश सरकारने विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढत असताना विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम होता. यामध्ये मध्य प्रदेश सरकाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ट्विट केलं आहे. त्यानुसार कोरोनाच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकारद्वारा कॉलेजमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्षाच्या मुलांची परीक्षा न घेता त्यांना जनरल प्रमोशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फायनल इअरची डिग्री मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे.

यासाठी शेवटच्या वर्षाच्या मुलांसाठी पेपर देण्यासाठी परीक्षा सेंटरवर जाण्याची गरज नसून पेपर ऑनलाईन पाठविण्यात येईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना घरात बसून वहीत त्याचे उत्तर लिहावे लागेल. सरकारकडून या वह्या कलेक्ट करण्यासाठी हजारोंच्या संख्येने हायस्कूल, माध्यमिक शाळांमध्ये कलेक्शन सेंटर तयार करण्यात येणार आहे. येथे विद्यार्थ्यांनी वह्या जमा कराव्या लागतील. शिवराज सिंह यांनी एक पत्र लिहून ते ट्विट केलं आहे. यामध्ये कोरोनाच्या संकटकाळात परीक्षेच्या पद्धतीत बदल केल्याचे नमूद केले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 27, 2020, 11:59 PM IST

ताज्या बातम्या