S M L

रेल्वेतल्या झोपेला एक तासाची कात्री

आता रेल्वे डब्यात झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली. डब्यात बर्थवरून होणाऱ्या भांडणावर तोडगा काढण्याचा प्रयत्नातून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला.

Sonali Deshpande | Updated On: Sep 18, 2017 01:19 PM IST

रेल्वेतल्या झोपेला एक तासाची कात्री

18 सप्टेंबर : लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करताना झोपेच्या वेळा निश्चित करण्यात आल्यात. आता रेल्वे डब्यात झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली. डब्यात बर्थवरून होणाऱ्या भांडणावर तोडगा काढण्याचा प्रयत्नातून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला.

यापूर्वी झोपण्याची वेळ होती रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत होती.  त्या वेळेत 1 तासाची कपात करण्यात आली. लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये अनेकदा हे प्रश्न निर्माण होतात. एकानं बर्थ उघडला की दुसऱ्याची गैरसोय होते. म्हणूनच रेल्वेनं हा निर्णय घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close