23 नोव्हेंबर : 'ओनिडा-ऑनर्स प्राईड' अशी जाहिरात आणि त्यातला तो शिंग असणारा राक्षस नवदीच्या काळात घराघरात पोहोचला. याच ओनिडा टीव्हीने भारतात अनेक वर्ष राज्य केलं. पण आता हीच ओनिडा कंपनी विकण्यात येणार आहे.
टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या मर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे चेअरमन गुलू मीरचंदानी म्हणाले की, 'मला जर चांगला नफा होणार असेल तर मी हा व्यवसाय विकायला तयार आहे.' मर्क इलेक्ट्रॉनिक्समध्ये मीरचंदानी आणि मनसुखानी कुटुंबाच्या प्रमोटर्सची 57.71 टक्के हिस्सेदारी आहे.
'अशा' बदलल्या ओनिडाच्या टॅगलाइन
- सन 1983पासून ते 1997 पर्यंत 'नेबर्स एनवी-ऑनर्स प्राईड' या टॅगलाईनने ओनिडा आपल्यासमोर आला.
- सन 1997 ते 2009 पर्यंत 'नथिंग बट ट्रूथ' अशी टॅगलाईन आली.
- सन 2009 ते 2011 पर्यंत 'डिझाईन विद यू इन माइंड' अशी टॅगलाईन आली. पण या जाहिरातीत तो शिंग असणार राक्षस नव्हता.
- सन 2011 ते 2013 पर्यंत कोणतीच नवीन टॅगलाईन त्यांनी वापरली नाही. पण 2013 पासून ते आतापर्यंत 'ऑनर्स प्राईड' या टॅगलाइनसोबत ओनिडा जाहिराती करत आहे.
का विकत आहेत ओनिडा?
मीरचंदानी यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या प्रमोटर्सना कंपनीचा फायदा झाल्यानंतर विकण्याची इच्छा नाही आहे, पण जर प्राइव्हेट इक्विटी फंडानुसार विकत घेणाऱ्याने 5-6 वेळा जर कंपनीचं व्हॅल्यूएशन केलं तर कंपनी विकण्याचा विचार केला जाऊ शकतो.
2010मध्ये कलर टीव्ही आणि डीव्हीडीचा व्यवसाय 1500 कोटींवर होता, पण पिक्चर ट्युबची उपलब्धता कमी झाल्यानंतर त्यांचा व्यवसायात अडचणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कंपनीच्या प्रमोटर्सने तिला विकण्याचा निर्णय घेतला आहे.
2016-17 मध्ये कंपनीचं एकूण उत्पन्न 747.59 कोटी रुपये इतकं होतं. याचदरम्यान कंपनीला 5.68 कोटींच नुकसानही झालंय. पण गेल्या तीन महिन्यामध्ये कंपनी फायद्यात आहे. त्यामुळे आता या कंपनीची विक्री होणार की नाही हेच बघणं महत्त्वाचं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा