तुमच्या मोबाईल कॉलवर 10 तपास यंत्रणा ठेवणार नजर, केंद्र सरकारचा वादग्रस्त निर्णय

कोणत्याही नागरिकाचा फोन कॉल टॅप करणे, फोनमधील इतर डेटा आणि कॉम्प्युटरमधील माहिती गोळा करणे हे आता सरकारी यंत्रणांना सहज शक्य होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 02:06 PM IST

तुमच्या मोबाईल कॉलवर 10 तपास यंत्रणा ठेवणार नजर, केंद्र सरकारचा वादग्रस्त निर्णय

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : केंद्र सरकारनं तमाम नागरिकांवर हेरगिरी करण्याचा अधिकारच 10 सरकारी यंत्रणांना दिला आहे. कोणत्याही नागरिकाचा फोन कॉल टॅप करणं, फोनमधील इतर डेटा आणि कॉम्प्युटरमधील माहिती गोळा करणं हे आता सरकारी यंत्रणांना सहज शक्य होणार आहे. यासाठी आधी केंद्रीय गृह खात्याची लेखी परवानगी लागायची, पण आता त्याची गरज लागणार नाहीये.

पण या सगळ्यावरून पक्षांमध्ये मोठा वाद पेटला आहे. हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे, असा आक्षेप अनेक तज्ज्ञ आणि सामान्य नागरिकांनी घेतला आहे. दहशतवादी कारवाया आणि इतर गंभीर गुन्ह्यांना आळा घालणं, हा या मागचा जाहीर हेतू असला तरी त्यासाठी गोपनीयतेचा किती भंग करायचा, यालाही मर्यादा असायला हव्या, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, देशातील 10 सुरक्षा यंत्रणा नागरिकांच्या कंप्युटरमधील कोणताही डेटा पाहू शकते. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडी आणि एमआयएमनं कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक नागरिकावर नजर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.

काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, 'या प्रकरणातली संपूर्ण माहिती आमच्याकडे नाही. पण जर आपल्या कंप्युटरवर कोणी नजर ठेवणार असेल तर आपण ऑरवेलियन स्टेटकडे जात आहोत.' खरं तर, जॉर्ज ऑरवेलियनने एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव '1984' होतं.या पुस्तकात नागरिकांना व्यक्तिस्वातंत्र्य देण्यात आलं नव्हतं. तर सरकार प्रत्येकावर नजर ठेवतं असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं होतं.


Loading...

त्याचबरोबर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'हर-हर मोदी, घर-घर मोदी' याचा अर्थ काय हे आता समजलं असं ओवेसी म्हणाले आहेत.

पाहूयात नेमक्या कोणत्या यंत्रणांना ही मुभा देण्यात आली...

- गुप्तचर खातं

- अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग

- अंमलबजावणी संचालनालय

- केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड

- महसूल गुप्तचर संचालनालय

- सीबीआय

- एनआयए

- रिसर्च अँड अनॅलिसीस विंग (रॉ)

- सिग्नल इंटेलिजन्स संचालनालय

- पोलीस आयुक्त, दिल्ली


Special Report: तुमच्यातही माणुसकी असेल पण मुंबईच्या या टॅक्सी चालकांमध्ये नाही... रुग्ण बनून टॅक्सीवाल्यांसोबत केलेलं हे स्टिंग ऑपरेशन याचा पुरावा आहे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...