उत्तर प्रदेशात लग्नाचं रजिस्ट्रेशन अनिवार्य

योगी सरकारनेही रजिस्ट्रेशन सक्तीचं करण्याची सूचना महिला कल्याण विभागाला केलीय. त्यानुसार या कायद्याचे निकष आता महिला कल्याण विभाग ठरवणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2017 03:38 PM IST

उत्तर प्रदेशात  लग्नाचं रजिस्ट्रेशन  अनिवार्य

13 जून : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार  लग्नाचं रजिस्ट्रेशन सरसरट सगळ्यांना कम्पलसरी करणार आहे.या आधी बिहार, हिमाचल प्रदेश , राजस्थान आणि केरळ या राज्यांनी लग्नाचे रजिस्ट्रेशन अनिवार्य केलंय.

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने लग्नाचे रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्याची सूचना राज्य सरकारांना केली होती.  त्यानुसार  बिहार, हिमाचल प्रदेश , राजस्थान आणि केरळ या राज्यांनी रजिस्ट्रेशन सक्तीचं केलं आणि न करणाऱ्यास दंडाचीही तरतूद केलीय. आता त्याच मार्गावर योगी सरकारनेही  रजिस्ट्रेशन सक्तीचं करण्याची सूचना महिला कल्याण विभागाला केलीय. त्यानुसार या कायद्याचे निकष आता महिला कल्याण विभाग ठरवणार आहे.

या आधी  रजिस्ट्रेशन सक्तीचं करण्यासाठी अहमद हसन कमिटी,अखिलेश सरकारने  राज्यात बसवली  होती. पण त्या कमिटीने काहीच ठोस निर्णय घेतले नव्हते.

आता मात्र यातून कुठल्याच समुदायाला सूट दिली जाणार नाही.ज्यांची लग्न हा कायदा येण्याच्या आधी झाली त्यांना मात्र सूट दिली जाईल. रजिस्ट्रेशन न करणाऱ्यांना मात्र  दंड भरावा  लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2017 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...