S M L

सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्षे?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय 58 वरून 60 करावं, याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. माजी सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आपला अहवाल पूर्ण केलाय.

Sonali Deshpande | Updated On: Sep 27, 2017 02:49 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्षे?

27 सप्टेंबर : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय 58 वरून 60 करावं, याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. माजी सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आपला अहवाल पूर्ण केलाय. निवृत्तीचं वय काही अटी ठेवून वाढवता येऊ शकतं, असा सकारात्मक अहवाल समितीने तयार केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

काय आहेत शिफारसी?

- निवृत्तीचं वय वाढविल्यास नवीन भरतीसाठीच्या निधीची बचत

- कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा

- पण नवीन भरती थांबल्यास तरुण रोजगारपासून वंचित

Loading...

- नवीन भरती थांबल्यास तरुणांमध्ये रोष वाढेल

- मानसिक, शारीरिक आजार असलेल्यांना मुदतवाढ नको

- चौकशी, भ्रष्टाचाराबाबत खटले सुरू असलेल्यांना मुदतवाढ नको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 02:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close