News18 Lokmat

रेल्वेचा एसी प्रवास होणार स्वस्त

या प्रस्तावित गाड्यांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील वातानुकूलित डब्यांबरोबरच इकॉनॉमी श्रेणीतील डबेही असतील आणि त्यांचे तिकीटदर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे असतील.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2017 01:04 PM IST

रेल्वेचा एसी प्रवास होणार स्वस्त

03 जुलै : रेल्वेचा वातानुकूलित प्रवास म्हणजे चैनच. त्यातही लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वातानुकूलित डबे तीनच, शिवाय त्यांचीही श्रेणी पद्धतीने वर्गवारी. म्हणजे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा वगैरे. परंतु त्यांचे भाडे तितकेसे परवडणारे नसल्याने सामान्यांना या डब्यांतून प्रवास करणे तसे दुरापास्तच. मात्र, आता कमी भाडे असलेले इकॉनॉमी वर्गाचे वातानुकूलित डबे लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत, परंतु संपूर्ण वातानुकूलित रेल्वेगाडीतच!

रेल्वे प्रशासनाने काही निवडक मार्गावर संपूर्ण वातानुकूलित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित गाड्यांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील वातानुकूलित डब्यांबरोबरच इकॉनॉमी श्रेणीतील डबेही असतील आणि त्यांचे तिकीटदर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे असतील.

परंतु या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ब्लँकेट्सची गरज लागणार नाही. कारण इकॉनॉमी श्रेणीतील या वातानुकूलित डब्यांचे तापमान २४ ते २५ डिग्री सेल्सिअसपर्यंत स्थिर असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...