S M L

आता शरद पवारांची डिनर डिप्लोमसी, सर्व विरोधकांना निमंत्रण

सोनिया गांधी यांच्या डिनर डिप्लोमसीनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानीही अशाच डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे.

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2018 06:10 PM IST

आता शरद पवारांची डिनर डिप्लोमसी, सर्व विरोधकांना निमंत्रण

नवी दिल्ली, 27 मार्च : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या  डिनर डिप्लोमसीनंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानीही अशाच डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधीपक्षांच्या एकजुटीची मोहित अधिक तीव्र होत आहे.  आज रात्री नवी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्व विरोधकांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या या स्नेहभोजनात विरोधकांची बैठक होणार आहे.

दरम्यान, चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सकाळी सोनिया गांधी आणि शरद पवार तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. स्वत: ममतादीदींनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन पवारांची भेट घेतली. एवढंच नाहीतर त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सुद्धा भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 04:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close