नवी दिल्ली, 14 जून : गेल्या काही दिवसांत बँकांमधील फसवणुकीचा अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंतर-कार्यालयीय निवेदनात सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने आपल्या सर्व शाखांना फसवणूकीपासून सावध रहायला सांगितले आहे. बँकेने या निवेदनात म्हटले आहे की, फसवणूक करणारे एकाचवेळी कोट्यवधी रुपये सरकारी संस्थांच्या नावे जमा करीत आहेत. बँकेच्या अहवालानुसार आतापर्यंत अशी दोन प्रकरणे नोंदविली गेली आहेत. ज्यामध्ये सरकारी संस्थांच्या नावे 47 कोटी आणि 100 कोटीची रक्कम जमा केली गेली आहे. दुसर्या गटाने बँकेकडे एफडी आणि चालू खात्यात 250 कोटी रुपये जमा करण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. तेव्हा ही दोन्ही प्रकरणे उघडकीस आली.
सर्व शाखांना निवेदन पाठवून केलं सावध
फसवणूकीच्या घटनेनंतर कॅनरा बँकेने 'फ्रॉड एज्युकेशनल सीरिज' जारी केली आहे. यामध्ये, बँकेने फसवणूक करणार्यांच्या कामाचा मार्ग (मोडस ऑपरेंडी) सांगितली आहे. याशिवाय बँकिंग व्यवस्थेचे कमकुवत दुवे आणि फसवणूक टाळण्याचे मार्गही सांगितले गेले आहेत. याव्यतिरिक्त, बँकेने सर्व शाखांना अशा ठेवींची माहिती संकलित करण्यास सांगितले आहे.
हे वाचा-सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली भावना, म्हणाले...सुशांतची धक्कादायक एक्झिट! धोनीच्या CSK नं दिली पहिली प्रतिक्रिया, असा शेवट...
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.