S M L

आता घर घेणं झालं स्वस्त, किमतींत 3 टक्क्यांनी घसरण

केंद्र सरकारनं नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट आणि जीएसटी लागू केल्यामुळं घरांच्या किंमती घटल्या आहेत. 'नाइटफ्रँक इंडिया रिअल इस्टेट'च्या अहवालानुसार, देशातील शहरांमधील घरांच्या किंमती सरासरी तीन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jan 11, 2018 01:22 PM IST

आता घर घेणं झालं स्वस्त, किमतींत 3 टक्क्यांनी घसरण

11 जानेवारी : केंद्र सरकारनं नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट आणि जीएसटी लागू केल्यामुळं घरांच्या किंमती घटल्या आहेत. 'नाइटफ्रँक इंडिया रिअल इस्टेट'च्या अहवालानुसार, देशातील शहरांमधील घरांच्या किंमती सरासरी तीन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

अहवालानुसार, पुण्यात ७ टक्के, तर मुंबईतील घरांच्या किंमती पाच टक्क्यांनी घटल्या आहेत. एनसीआरमधील घरांच्या किंमतींमध्ये सहा वर्षांपासून सातत्यानं घट झाल्याचे पाहायला मिळते. गेल्या वर्षीही किंमती दोन टक्क्यांनी घसरल्या होत्या. घरांच्या किंमती घसरण्यामागे मागणी कमी असल्याचं कारण सांगण्यात येतं.

बेंगळुरूमध्ये 26 टक्के, दिल्ली-एनसीआर 6 टक्के आणि  चेन्नईतील घरांच्या विक्रीत २० टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मुंबई आणि पुण्यातील घरांच्या खरेदीत थोडी वाढ झाल्याचं दिसून येतं.  अहवालानुसार, महाराष्ट्रात 'रेरा'ची योग्य अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यातील घरांच्या विक्रीत अनुक्रमे तीन आणि पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 01:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close