मराठी बातम्या /बातम्या /देश /रेल्वे सुसाट! आता एक मिनिटात अडीच लाख तिकीटांचे बुकिंग शक्य, प्रवाशांना 'या' सुविधाही मिळणार

रेल्वे सुसाट! आता एक मिनिटात अडीच लाख तिकीटांचे बुकिंग शक्य, प्रवाशांना 'या' सुविधाही मिळणार

देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वे सेवेचा लाभ घेतात. त्यांना तिकीट बुकिंगसाठी किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो मात्र आता ही अडचन लवकरच दूर होणार आहे.

देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वे सेवेचा लाभ घेतात. त्यांना तिकीट बुकिंगसाठी किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो मात्र आता ही अडचन लवकरच दूर होणार आहे.

देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वे सेवेचा लाभ घेतात. त्यांना तिकीट बुकिंगसाठी किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो मात्र आता ही अडचन लवकरच दूर होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. कारण, रेल्वेच्या माध्यमातून कमी दरात आरामदायी प्रवास करता येतो. आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयानं आता एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

रेल्वनं आपली संपूर्ण बॅक-एंड सिस्टम अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन तिकीटांची सुविधा आणि प्रवाशांच्या प्रश्नांना अधिक जलद प्रतिसाद मिळणार आहे. ही प्रक्रिया या वर्षी (2023) सप्टेंबर महिन्यापासून सुरू होईल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. नेक्स्ट जनरेशन ई-तिकीटिंग प्रवासी आरक्षण प्रणालीचं बॅक-एंड इन्फ्रास्ट्रक्चर जास्त क्षमतेमध्ये अपग्रेड केलं जाईल. त्यामुळे सध्याच्या 25 हजार तिकीटांच्या तुलनेत भविष्यात प्रतिमिनिट 2.5 लाख ऑनलाइन तिकिटं जारी करता येतील.

सुविधा वाढवण्यावर भर  

याबाबत बोलताना वैष्णव म्हणाले की, 2023 ते 24 दरम्यान रेल्वे मंत्रालय प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करेल. "तिकीट जारी करणं आणि चौकशीला उपलब्ध राहणं या दोन्हीसाठी 10 पटीनं क्षमता वाढवण्याचं आमचं लक्ष्य आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत, संपूर्ण बॅकएंड प्रणाली अपग्रेड केली जाईल. प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची क्षमतादेखील प्रतिमिनिट चार लाखांहून 40 लाखांपर्यंत अपग्रेड केली जाईल," असं वैष्णव यांनी सांगितलं.

हेही वाचा : गोष्ट गावाच्या नावाची! गावाचं नाव उच्चारायला वाटायची लाज, उडवली जायची थट्टा

सेफ्टी फीचर्सवरही लक्ष 

ते पुढे म्हणाले की, तिकीट मिळविण्यासाठी कोणीही सिस्टमला बायपास करणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी सेफ्टी फीचर्समध्ये देखील सुधारणा होतील."देशभरातील दोन हजार रेल्वे स्थानकांवर 'जन सुविधा' किंवा सार्वजनिक सुविधा स्टोअर सुरू करणे हा एक नवीन उपक्रम विचाराधीन आहे. प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आणि प्रवासादरम्यान लागणाऱ्या सर्व वस्तू या स्टोअरमध्ये विकल्या जातील," अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.

हेही वाचा : Success Story : IAS होण्यासाठी सोडली लाखोंची नोकरी, गड्यानं पहिल्याच प्रयत्नात मारलं मैदान!

प्रवाशांच्या अडचणी दूर होणार  

देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वे सेवेचा लाभ घेतात. मात्र, त्यांना तिकीट बुकिंगसाठी किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. संपूर्ण ऑनलाइन सिस्टीम अपग्रेड झाल्यास या अडचणी दूर होतील, अशी शक्यता आहे. लाखो प्रवासी या सुविधेचा लाभ घेतील.

First published: