Home /News /national /

आता पराठ्यावर 18 टक्के जीएसटी, आनंद महिंद्रांनी अशी घेतली फिरकी

आता पराठ्यावर 18 टक्के जीएसटी, आनंद महिंद्रांनी अशी घेतली फिरकी

सध्या देशात अनेक आव्हाने आहेत. या सगळ्यात आता आपल्याला पराठ्याच्या अस्तित्वाबाबतही काळजी करावी लागणार आहे

    नवी दिल्ली, 13 जून : कर्नाटकस्थित अॅरडव्हान्स डिसीजन अथॉरिटीने (एएआर) शुक्रवारी नवीन प्रणाली निश्चित केली आहे. त्यांच्या मते पराठे, रोटी या थेट वापराच्या वा उपभोगाच्या वस्तू नाहीत. खाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते, त्यामुळे पराठ्यांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 18 टक्के दर असेल. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी या निर्णयाची चांगलीच फिरकी घेतली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'सध्या देशात अनेक आव्हाने आहेत. या सगळ्यात आता आपल्याला पराठ्याच्या अस्तित्वाबाबतही काळजी करावी लागणार आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काहीही झाले तरी भारतीय जुगाडचे कौशल्य पाहता मला खात्री आहे की परोटीस (पराठा आणि रोटी) हा नवीन संकर उदयास येईल. हे याबाबतच्या कोणत्याही वर्गीकरणाला आव्हान देईल, हे नक्की. बंगळुरुस्थित कंपनी आयडी फ्रेश फूड्सने, एएआरच्या कर्नाटक खंडपीठासमोर अर्ज करुन याबाबत विचारणा केली होती. संपूर्ण गव्हाचा पराठा आणि मलबार पराठा ज्या वर्गीकरणात येतात, त्यानुसार त्यावर 5 टक्के जीएसटी लागावा. अर्ज करणारी आयडी फ्रेश फूड्स ही खाद्य उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी स्वयंपाकासाठी तयार असलेल्या इडली, डोसा, पराठा आणि रोटीसारखी उत्पादने विकते. एएआरने आपल्या निष्कर्षात म्हटले आहे की, सीमाशुल्काबाबतच्या कायद्यात किंवा जीएसटीच्या कायद्यात पराठ्यांबाबत वेगळी नोंद नाही. एएआरने नमूद केले की साधी चपाती, खाकरा आणि रोटीला पाच टक्के जीएटीची तरतूद आहे. पराठ्याचा समावेश यात येत नाही, कारण पराठा म्हणजे काही चपाती, रोटी किंवा खाकरा नव्हे. हे वाचा-Coronavirus : मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्टीत वाढ
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या