राफेलच्या पूजनाचं पाक लष्करानं केलं समर्थन, म्हणाले...

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये राफेलचं पूजन केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 11:43 AM IST

राफेलच्या पूजनाचं पाक लष्करानं केलं समर्थन, म्हणाले...

कराची, 11 ऑक्टोबर : काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानी नेते सातत्यानं भारताविरुद्ध वक्तव्य करत आहेत. मात्र, आता पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी राफेलच्या पूजनावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे समर्थन केले आहे. फ्रान्समध्ये राफेलचं पूजन केल्यानं देशभरातून राजनाथ सिंह यांना टीकेला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी राफेलच्या पुजेत काहीही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे.

आसिफ गफूर यांनी ट्वीट करत म्हटलं की, राफेलची पूजा करणं हे धर्माला अनुसरून आहे. कृपया, लक्षात ठेवा की.. हे एकच शस्त्र नाही जे महत्त्वाचं आहे. याशिवाय हे शस्त्र चालवणारी व्यक्ती, त्याची क्षमता आणि संकल्प महत्त्वाचा आहे.

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भारत-पाक यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत. भारताने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम रद्द केलं. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून वारंवार धमकीची भाषा वापरली जात होती. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी राजनाथ सिंह यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.

मॅरीग्नेकमध्ये दसॉ एव्हिएशन फॅक्टरीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गेले होते तिथं त्यांनी राफेल विमानांची पाहणी केली. फ्रान्सने भारताला 36 राफेल विमानं देण्याचा करार केला आहे. भारतीय हवाई दलाचा स्थापना दिवस दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राफेल विमानाचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर विरोधकांनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली होती.

Loading...

टीका करणाऱ्यांना राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, लोकं जे पाहिजे ते म्हणू शकतात. मी तेच केलं जे मला योग्य वाटलं आणि मी ते थांबवणार नाही. जगात सुपर पॉवर आहे यावर माझा लहाणपणापासून विश्वास आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं.

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...