माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा करु नका-प्रियांका गांधी

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा करु नये, त्यापेक्षा तुम्ही सर्वांनी बूथ स्थरावर काम करावे, हे विधान अन्य कोणाचे नाही तर काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांचे आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 09:40 AM IST

माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा करु नका-प्रियांका गांधी

बुंदेलखंड, 19 फेब्रुवारी: पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा करु नये, त्यापेक्षा तुम्ही सर्वांनी बूथ स्थरावर काम करावे, हे विधान अन्य कोणाचे नाही तर काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले खरे पण आता पक्षाच्या या स्टार नेत्याने फार अपेक्षा करु नका, असे स्पष्ट केले आहे.

वाचा- 'राहुल गांधी मला 2015 सालीच राजकारणात आणत होते, पण...'

लोकसभा निवडणुकीत एखाद्या चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. त्यापेक्षा पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी सर्व मतदारसंघात काम करण्याचा सल्ला प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. बुंदेलखंड येथे कार्यकर्त्यांशी त्या बोलत होत्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांनी 41 जागांची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंड विभागात विधानसभेच्या 19 तर लोकसभेच्या 4 जागा आहेत. यात झांशी-लिलतपूर, जालौन, बांदा आणि हमीरपूर यांचा समावेश होते.

VIDEO : इंदिराजींसारखं दिसण्यासाठी प्रियांकांनी सर्जरी केल्याची सोशल मीडियावर चर्चा

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बूथ स्तरावर मजबूत करण्याची गरज आहे. तुमच्या सहकाऱयानेच मी राज्यात पक्षाला मजबूत करु शकते, असेही प्रियांका यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. गेल्याच आठवड्यात प्रियांका यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची मोठी बैठक घेतली होती. या बैठकीत पक्ष विरोधी कारवाई केल्यास तातडीने बाहेरचा रस्ता दखवला जाईल असा दम त्यांनी दिला होता.

Loading...

उत्तर प्रदेश मोठे राज्य असल्याने राहुल गांधी यांनी पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका यांच्यावर तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका गांधी यांनी लखनऊ, उन्नाव, मोहनलालगंज, रायबरेली, प्रतापगढ, प्रयागराज, आंबेडकर नगर, सीतापूर, कौशींबी, फतेहपूर, बहराइच, फूलपूर आणि अयोध्या या लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत 16 तास बैठक घेतली होती.

केवळ लोकसभा निवडणुकीसाठी नाही तर त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी दिल्याचे राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.


काही मुद्द्यांवर मतभेद झाले पण 'युती पक्की', मुख्यमंत्र्यांची संपूर्ण PRESS CONFERENCE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...