'शरद पवारच नाही तर कुणीही होऊ शकतं पंतप्रधान'

अमित शहांचा भूगोल कच्चा आहे. वायनाड हा काही मुस्लिम बहुल किंवा ख्रिश्चन बहुल मतदार संघ नाही तर तो आदिवासी बहुल मतदारसंघ आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 05:51 PM IST

'शरद पवारच नाही तर कुणीही होऊ शकतं पंतप्रधान'

नवी दिल्ली 31 मार्च : लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारच नाही तर कुणीही पंतप्रधान होऊ शकतं असं मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केलंय. 'न्यूज18'च्या  'अजेंडा इंडिया' या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या कुठल्याही नागरिकाला पंतप्रधान होता येतं असंही ते म्हणाले.

सुरजेवाला म्हणाले, 2019 मध्ये सरकार कुणाचंही आलं तरीही राम मंदिराच्या प्रश्नावर काँग्रेस कोर्टाच्या निर्णयाच्या बाजूनं असेल. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार, कोर्टाच्या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा असेल. राजकारण विकासाच्या मुद्यावर करायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर आणि दक्षिण भारतात तेढ निर्माण केलं त्यामुळे देशात दरी निर्माण होते आहे.

अमित शहांचा भूगोल कच्चा आहे. वायनाड हा काही मुस्लिम बहुल किंवा ख्रिश्चन बहुल मतदार संघ नाही तर तो आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे तुष्टीकरणाचा आरोप खोटा आहे.

सहिष्णुता आणि सर्वांचा आदर हा हिंदूत्वाचा आत्मा आहे. भाजपला खरं हिंदुत्व कळलेलंच नाही.

भाजपने हवाई हल्ल्याचा वापर राजकारणासाठी केला. अशा घटना या देशासाठी स्वाभिमानाच्या असतात. त्यावर राजकारण होऊ नये. काँग्रेसने कधीही देशाच्या लष्कराच्या शौर्यावर शंका व्यक्त केली नाही.

Loading...

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...