माल्ल्या आणि नीरव मोदीच नव्हे असे आणखी 36 धनदांडगे पळालेत देशाबाहेर : ED ची धक्कादायक माहिती

माल्ल्या आणि नीरव मोदीच नव्हे असे आणखी 36 धनदांडगे पळालेत देशाबाहेर : ED ची धक्कादायक माहिती

कर्जबुडव्या विजय माल्ल्या किंवा नीरव मोदी यांच्याप्रमाणे आर्थिक गुन्हे नोंदवले करून अनेक बडे व्यावसायिक देशाबाहेर पळून गेले आहेत, अशी धक्कादायक कबुली ED ने कोर्टात दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : आर्थिक घोटाळे करून किंवा कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या धनदांडग्या व्यावसायिकांची संख्या तब्बल 36 असल्याची माहिती उघड झाली आहे. कर्जबुडव्या विजय माल्ल्या किंवा नीरव मोदी ही काही मोजकी नावं आहेत, अशा प्रकारे आर्थिक गुन्हे नोंदवले गेलेले अनेक बडे व्यावसायिक गेल्या काही वर्षांत देशाबाहेर पळून गेल्याची धक्कादायक कबुली ED ने कोर्टापुढे दिली आहे.

ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानेच ही माहिती कोर्टापुढे सादर केली. सुशेन मोहन गुप्ता नावाचा संरक्षण क्षेत्रातल्या दलालाने केलेल्या जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी ED ने ही माहिती दिली. देश सोडून पळून जाणार नाही, कारण समाजात आपली मुळं घट्ट रुतलेली आहेत, असं या सुशेन गुप्ताच्या वतीने सांगण्यात आलं. त्याच्या या दाव्याला खोडून काढताना EDचे विशेष वकील डी. पी. सिंग आणि एन. के. मित्तल यांनी कोर्टाला सांगितलं की, "माल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशांचीसुद्धा या समाजात याहून घट्ट मुळं होती, पण तरीही ते देश सोडून गेले. असे आणखी 36 व्यावसायिक आहेत, जे गेल्या काही वर्षांत देश सोडून पळून गेलेले आहेत."

विजय माल्या म्हणाला, 'जेलमध्ये जाऊनही मी कर्ज फेडेन'

आयकर विभागाचे छापे घालून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न - काँग्रेस

सुशेनमोहन गुप्ता ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी आरोपी आहे आणि त्याला जामीन मिळू नये अशी मागणी ED तर्फे कोर्टात करण्यात आली. सुशेनच्या डायरीत RG असा उल्लेख आहे, त्याचा संदर्भ शोधण्याचा सध्या तपासयंत्रणा प्रयत्न करत आहेत. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात हा शोध अत्यंत महत्त्वाचा असून अशा ऐन मोक्याच्या वेळी गुप्ताला जामीन मिळता कामा नये, असं ED च्या वतीने सांगण्यात आलं.

गुप्ताला मनी लाँडरिंगच्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे. गुप्ताकडे 3600 कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड खरेदी प्रकरणातली महत्त्वाची कागदपत्र असण्याची शक्यता आहे, असं या तपास यंत्रणांनी सांगितलं.

पवारांनी कुटुंबाबाबत केलेल्या टीकेला मोदींकडून पहिल्यांदाच प्रत्युत्तर, पाहा VIDEO

First published: April 17, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading