मेहुल चोक्सी प्रकरणी भारताला मोठा धक्का!

मेहुल चोक्सी प्रकरणी भारताला मोठा धक्का!

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी भारताला हव्या असणाऱ्या मेहुल चोक्सीला देशात आणण्याच्या प्रयत्न पुन्हा मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी: पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी भारताला हव्या असणाऱ्या मेहुल चोक्सीला देशात आणण्याच्या प्रयत्न पुन्हा मोठा धक्का बसला आहे. याआधी चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडून अँटिग्वाचे नागरिकत्व स्विकारले होते. आता खुद्द अँटिग्वा सरकारने चोक्सीला भारतात पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले.

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे काही अधिकारी अँटिग्वाला बोईंग विमान घेऊन जाणार असल्याचे वृत्त आले होते. यावर स्पष्टीकरण देताना PMO कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी सांगितले की, आता चोक्सी यांचे नागरिकत्व काढून घेता येणार नाही.

चोक्सीला घेण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे पथक आल्यासंदर्भात कोणतीही माहिती आमच्याकडे नसल्याचे देखील हर्स्ट यांनी स्पष्ट केले.PNB घोटाळ्याप्रकरणी भारताला मेहुल चोक्सीसह नीरव मोदी देखील हवा आहे. ईडीकडून त्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरु असताना तपास यंत्रणांना हा धक्का बसला आहे.

VIDEO : शिवसेनाच मोठा भाऊ आहे आणि राहणार - संजय राऊत

First published: January 28, 2019, 3:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading