मोदींच्या नावाने काही तरी हवं; भाजप खासदार म्हणाले, 'या' विद्यापीठाचं नाव बदला!

मोदींच्या नावाने काही तरी हवं; भाजप खासदार म्हणाले, 'या' विद्यापीठाचं नाव बदला!

मोदींनी केलेल्या कामगिरीनंतर आता भाजपच्या खासदाराने एका विद्यापीठाचे नाव बदूलन मोदींचे नाव ठेवा, असा सल्ला दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 A हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अनेक जण अभिनंदन करत आहेत. भाजपच्या नेत्यासोबतच एनडीएतील नेते आणि अन्य काही विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदी-शहा जोडीचे कौतुक केले आहे. मोदींनी केलेल्या या कामगिरीनंतर आता भाजपच्या खासदाराने एका विद्यापीठाचे नाव बदूलन मोदींचे नाव ठेवा, असा सल्ला दिला आहे.

दिल्लीचे भाजपचे लोकसभेतील खासदार हंसराज हंस यांनी जवाहर लाल नेहरू विद्यापीठाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. मोदींनी कलम 370 हटवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांना आनंद झाला आहे. JNU येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ही एक आनंदाची बातमी म्हणजे आता काश्मीर खरोखरच स्वर्ग होणार आहे. 370चे प्रकरण सर्वांनाच आवडले. आता सर्वांनी प्रार्थना करावी की लोक शांततेने आणि प्रेमाने राहतील. कमीत कमी हिंसाचार होईल. माझी तरी इच्छा आहे की हिंसाचार होऊ नये. व्यक्ती इकडचा मरो की तिकडचा, तो असतो कोणत्या तरी आईचा मुलगा. नंतर परमवीर चक्र किंवा धर्मवीर चक्र दिल्याने त्या आईचा मुलगा परत येत नाही, असे हंसराज म्हणाले.

ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हंसराज म्हणतात, 'आपल्या पूर्वजांनी अनेक चुका केल्या आहेत. त्याची शिक्षा आपण भोगतोय. माझ्या मते या विद्यापिठाचे नाव JNUच्या ऐवजी MNU असे करावा. मोदींच्या नावाने देखील काही तरी झाले पाहिजे ना. मोदींनी अशक्य असलेली गोष्ट शक्य करून दाखवली. त्यामुळेच म्हणतात ना, मोदी है तो मुमकिन है.'

तीन भारतीय ठरले पाकिस्तानला भारी, हा VIDEO पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 06:17 PM IST

ताज्या बातम्या