Home /News /national /

ऐन दिवाळीत देशात कोरोनाची रुग्णसंख्या गाठेल उच्चांक; ICMR चे धक्कादायक भाकीत

ऐन दिवाळीत देशात कोरोनाची रुग्णसंख्या गाठेल उच्चांक; ICMR चे धक्कादायक भाकीत

गेल्या काही दिवसांमध्ये देशात 80 हजारांच्या जवळपास दररोज नव्याने रुग्ण निघत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात 80 हजारांच्या जवळपास दररोज नव्याने रुग्ण निघत आहेत.

आतापर्यंत जुलैमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतील असे सांगितले जात होते. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे

    मुंबई, 14 जून : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहेत. जून-जुलै या महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलैमध्ये नाही तर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात कोरोनाचा पीक म्हणजेच कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू शकते. त्यादरम्यान आयसोलेशन, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेशन याची कमतरता भासू शकते असं अभ्यासातून समोर आलं आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा उच्चांक हा पुढे गेला आहे. आता एका अभ्यासानुसार ऐन दिवाळीत देशात कोरोनाची रुग्णसंख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. आयसीएमआरने गठित केलेल्या ऑपरेशन्स रिसर्च ग्रुपच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, लॉकडाऊनने साथीच्या रोगाची तीव्रता अंदाजे 34 ते 76 दिवसांपर्यंत कमी केली आहे आणि  संक्रमणांची संख्या 69 ते 97 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यास मदत केली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला पुढील संसाधने आणि पायाभूत सुविधा तयार करण्यास वेळ मिळाला. येत्या काही दिवसात आयसोलेशन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर यामध्ये मोठी कमतरता भासू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र लॉकडाऊनमुळे कोरोनाचा धोका तब्बल 83 टक्क्यांनी कमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. हे वाचा-VIDEO : आईचं स्वप्न पूर्ण केलं पण ती नाही; टीव्ही शोमध्ये सुशांत झाला होता भावूक
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या