Home /News /national /

दाऊद इब्राहिम नाही तर हा आहे देशातला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, 2.5 कोटींचं इनाम!

दाऊद इब्राहिम नाही तर हा आहे देशातला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, 2.5 कोटींचं इनाम!

गणपती शरण आला तर माओवादी चळवळीला मोठा हादरा बसणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांना तो हवा आहे.

    नवी दिल्ली 05 सप्टेंबर: अडंरवल्ड डॉन दाऊद इब्राहिला (Dawood Ibrahim)  अटक करण्यासाठी देशातल्या सर्व सुरक्षा यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र तो पाकिस्तानात दडून बसल्याने हाती लागलेला नाही. पण दाऊद पेक्षाही माओवादी नेता गणपती (Maoist Leader Ganapathy) याच्य नावावर जास्त रकमेचं इनाम आहे. गणपतीला अटक करणाऱ्या किंवा त्याची ठोस माहिती देणाऱ्यासाठी तब्बल अडीच कोटींपेक्षा जास्त रुपयांचं इमान घोषीत करण्यात आलं आहे. माओवादी चळवळीचा म्होरक्या असलेला गणपती आता शरण येण्याच्या मानसिकतेत (he may surrender in Telangana)  असून पडद्या मागे चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेमुळे गणपतीच्या कारनाम्यांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गणपती उर्फ मुप्पला लक्ष्मण राव याने माओवादी चळवळीचं नेतृत्व केलं असून देशभर त्याचा विस्तारही केला आहे. महाराष्ट्रासह, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार या राज्यांनाही गणपती हवा आहे. गेली काही दशकं याने देशातल्या अनेक राज्यांमध्ये मोठया हिंसक कारवाया घडवून आणल्या आहे. बापरे! एका क्षणात खाली आले डोंगराचे दगड, भूस्खलनाचा थरारक VIDEO आला समोर सध्या तो गंभीर आजारी असून नोव्हेंबर महिन्यात त्याने चळवळीचं नेतृत्व दुसऱ्या कडे सोपवलं होतं. गेल्या तेरा वर्षांपासून तो चळवळीच्या प्रमुखपदी होता. पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या मुपाल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने पदत्याग केलाय. तर संघटनेचा नवा प्रमुख म्हणून नंबाला केशव राव उर्फ बसवराजुची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे गणपतीने पदत्याग केल्याचं सांगितलं जातं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संघटनेचा महासचिव गण्पती यांनी स्वत:हून पदत्याग करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गणपती हा 71 वर्षांचा आहे. गणपतीला पदमुक्त करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नंबाला केशव उर्फ बसवराजू हा गेल्या 35 वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असून बॉम्ब आणि स्फोटकतज्ज्ञ म्हणून त्याला ओळखले जातो. नागमोडी वळणावर ओव्हरटेक करायला गेला आणि घात झाला, अपघाताचा LIVE VIDEO माओवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी कमिटीचा प्रमुख म्हणून बसवराजूकडे अनेक वर्षे जबाबदारी होती. अनेक हिंसक माओवादी कारवायांची योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीमागे बसवराजूची मुख्य भुमिका होती. गणपती शरण आला तर माओवादी चळवळीला मोठा हादरा बसणार आहे. तेलगंणा सरकार आणि गणपती दरम्यान चर्चेच्या फेऱ्या सुरू असून त्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या