एकही मुस्लिम योजनांच्या फायद्यापासून वंचित नाही - योगी आदित्यनाथ

'सबका साथ, सबका विश्वास' ही फक्त घोषणा नव्हती तर ती आमची बांधीलकी होती आम्ही प्रत्येक काम त्याच बांधिलकीने करतो.'

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 10:45 PM IST

एकही मुस्लिम योजनांच्या फायद्यापासून वंचित नाही - योगी आदित्यनाथ

लखनऊ18 सप्टेंबर : गरीब माणूस हा राज्य सरकारच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू आहे. आमची प्रत्येक योजना ही समाजातल्या तळागाळात राहणाऱ्या माणसांसाठी आहे. त्यामुळे योजना राबवताना भेदभाव नसतो. नागरीक हा कुठल्या जातीचा धर्माचा, रंगाचा आहे हे पाहून त्याला मदत दिली जात नाही. आमच्या योजनांपासून एकही मुस्लिम व्यक्ती वंचित नाही. सबका साथ, सबका विश्वास हे आमचं धोरण आहे असं ठाम प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. News18 Network चे ग्रुप एडिटर राहुल जोशी यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

Special Report : 'पवारसाहेब भाकरी फिरली कुठे?'

निवडणुकीचा प्रचार करणारे योगीजी आणि मुख्यमंत्री असलेले योगीजी यात फरक आहे अशी टीका काही लोक करतात. कारण प्रचारातले योगी आदित्यनाथ हे कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे होते, नंतर ते मवाळ झाले  असा प्रश्न आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. आदित्यनाथ पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत सबका साथ सबका विश्वास ही फक्त त्यांची घोषणा नव्हती तर ती आमची बांधीलकी होती आम्ही प्रत्येक काम त्याच बांधीलकीने करतो असंही ते म्हणाले.

'विजयाचा अहंकार असू नये' : पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत गडकरींचा टोल

उत्तर प्रदेशात 25 लाख लोकांना घरं दिलीत. त्यात फक्त हिंदूनाच ती मिळाली नाहीत तर त्यात मुस्लिमही होते. उत्तर प्रदेशात मुस्लिम 18 टक्के आहेत. कितीतरी जास्त मुस्लिमांना या योजनांचा लाभ मिळालाय. लाभ देताना फक्त गरीब म्हणून, गरजू म्हणून त्याकडे पाहिलं जातं. आणि हेच  सरकारचं धोरण आहे असंही आदित्यनाथ यांनी सांगितलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 10:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...