Nostalgic: पुन्हा राम अवतरणार! पुन्हा रस्त्यांवर शुकशुकाट होणार...

Nostalgic: पुन्हा राम अवतरणार! पुन्हा रस्त्यांवर शुकशुकाट होणार...

दूरदर्शनवर महाभारत, रामायण सुरू होण्यापूर्वीचं संगीत आजही जनतेला आठवतं. लॉकडाऊनदरम्यान Nostalgic होण्याची संधी मिळणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळ्या प्रकारे घरात राहून आपला वेळ घालवत आहेत. मनोरंजन क्षेत्राला कोरोना (Covid - 19) विषाणूचा फटका बसला आहे. सध्या नाही नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ना टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग सुरू आहे.

अशा परिस्थितीत जवळजवळ सर्व टीव्ही चॅनेल्सवर शोचे रिपीट टेलिकास्ट सुरू आहेत. देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो रामायण (Ramayan) आणि महाभारत (Mahabharat) पुन्हा प्रसारित करण्याचा विचार दूरदर्शन (Doordarshan) करीत आहे.

संबंधित - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज, मोदी सरकारच्या 7 मोठ्या घोषणा

दूरदर्शनच्या सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश आहे. या अशा मालिका आहेत ज्यांनी इतिहास घडविला आणि त्यात काम करणारे सर्व कलाकारांचं वेगळीच चर्चा होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसार भारतीच्या शशी शेखर यांनी ट्विटरवर एका वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही बातमी प्रसिद्ध केली आहे आणि सांगितले आहे की हे शो कोणत्या वेळेत  प्रसारित केले जातील हेदेखील लवकरच समोर येईल. नुकतीच रामायणची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती.

कपिल शर्माशी झालेल्या संभाषणादरम्यान प्रत्येकाने खूप मजा केली  आणि हा एपिसोडची चांगलीच चर्चा रंगली होती. रामायण त्या काळातील एक टीव्ही कार्यक्रम होता जेव्हा टीव्हीवर देवाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना खरोखरच रामचं रूप मानलं जात होतं आणि हे कलाकार ज्या गावात किंवा खेड्यात-जायचे तेथे प्रत्येक गावात त्यांचा देवासारखं स्वागत केलं जात होतं. द कपिल शर्मा शोवरील संभाषणादरम्यान शोच्या स्टारकास्टने शूटिंगच्या काळातील  अनेक मजेदार किस्से शेअर केले होते.

संबंधित - धक्कादायक! निरोगी झालेल्या 10% लोकांना पुन्हा होतोय कोरोना, डॉक्टरही झाले हैराण

First published: March 26, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading