मराठी बातम्या /बातम्या /देश /

Twin Tower Demolition : टॉवर पडल्यानंतर पुढं काय होणार, 'ही' कामं पूर्ण करण्यासाठी लागणार 3 महिने

Twin Tower Demolition : टॉवर पडल्यानंतर पुढं काय होणार, 'ही' कामं पूर्ण करण्यासाठी लागणार 3 महिने

ट्विन टॉवरच्या 60 हजार टन ढिगाऱ्यातून जन्मणार अनेक गोष्टी;

ट्विन टॉवरच्या 60 हजार टन ढिगाऱ्यातून जन्मणार अनेक गोष्टी;

Twin Tower Demolition: बेकायदेशीरपणे बांधलेले 100 मीटर उंच ट्विन टॉवर अवघ्या नऊ सेकंदात जमीनदोस्त झाले. त्यानंतरही अनेक कामं बाकी आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

मुंबई, 29 ऑगस्ट :  दिल्ली जवळच्या नोएडा येथील सुपरटेक ट्विन टॉवर्स (Supertech Twin Towers) रविवारी (28 ऑगस्ट 2022 ) पाडण्यात आले. बेकायदेशीरपणे बांधलेले 100 मीटर उंच ट्विन टॉवर अवघ्या नऊ सेकंदात जमीनदोस्त झाले. हरियाणातून आणलेली 3600 किलो पेक्षा जास्त स्फोटकं वापरून एपेक्स आणि सियान नावाचे हे टॉवर्स पाडण्यात आले. हे ट्विन टॉवर कोसळल्यानंतर (Twin Tower Demolition) आजूबाजूचा परिसर धुराच्या लोटांत बुडाला होता. मुंबईतील एडिफिस इंजिनीअरिंगने हे टॉवर पाडण्याचे काम केले.

पुढे काय होणार?

32 मजली एपेक्स 29 मजली सियान इमारती इम्प्लोजन पद्धतीने पाडण्यात आल्या. नोएडाचे पोलीस आयुक्त आलोक सिंग यांनी CNN-News18 ला सांगितलं की, पाडकाम प्लॅनिंगनुसार झालं आणि संबंधित लोकांनी खूप चांगलं काम केलं. आता आम्ही तिथल्या पुढील कामांचा फॉलोअप घेत आहोत. इमारती कोसळल्यानंतर आता तिथे सिमेंट, लोखंड आणि विटांचा राडारोडा पसरला आहे. या राडारोड्याचं काय केलं जाईल, ते जाणून घेऊयात.

- प्रोजेक्ट अधिकार्‍यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या पाडकामामुळे अंदाजे 35,000 क्युबिक मीटर राडारोडा तयार होणार होईल.

- 21,000 क्युबिक मीटर राडारोडा हटवला जाईल आणि शहराच्या वर्क सर्कल सात हद्दीतील पाच ते सहा हेक्टरच्या एका नापीक जमिनीवर टाकला जाईल, असं नोएडा अथॉरिटीचे जनरल मॅनेजर (प्लॅनिंग) इश्तियाक अहमद (Noida Authority’s General Manager (Planning) Ishtiaq Ahmed ) यांनी सांगितलं.

VIDEO: स्फोट, भूकंप, धुळ, राडारोडा.. ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर आता परिस्थिती कशी आहे?

- उर्वरित राडारोडा हा ट्विन टॉवर्सच्या बेसमेंटमध्ये पडलेल्या खड्ड्यात टाकण्यात येईल.

- हा राडारोडा हटवण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

- नोएडा अथॉरिटीचे जनरल मॅनेजर (प्लॅनिंग) इश्तियाक अहमद यांनी पीटीआयला सांगितलं की, 'पाडकाम केल्यानंतरच्या राडारोड्याचं नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केलं जाईल. त्यावर अंतिम निर्णय रिजनल पोल्युशन कंट्रोल बोर्ड (Regional Pollution Control Board) घेईल. ते डेब्रिस मॅनेजमेंटवर एडिफिस इंजिनीअरिंगच्या (Edifice Engineering) रिपोर्टचे परीक्षण करत आहेत.

- या राडारोड्यातून किमान 4,000 टन लोखंड (Iron) आणि स्टील (Steel ) निघण्याची अपेक्षा आहे. ते विकून एडिफिस या पाडकामाचा खर्च वसूल करणार आहे.

- या ढिगाऱ्यांमधील काही राडारोडा नोएडा प्राधिकरणाच्या सेक्टर 80 मधील कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट मॅनेजमेंट प्लांटमध्ये (Construction and Demolition Waste Management Plant ) नेला जाण्याची शक्यता आहे. या प्लांटची दैनंदिन क्षमता 300 टन आहे.

- हा राडारोडा वाहून नेण्यासाठी ट्रक 1,300 फेऱ्या मारतील.

अशा रितीने हे ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर झालेल्या राडारोड्याचं व्यवस्थापन केलं जाणार आहे.

First published:

Tags: Uttar pardesh