मराठी बातम्या /बातम्या /देश /Love Triangle: एकाच मुलावर जडलं दोन मैत्रिणींचं प्रेम, रात्री भांडणानंतर एकिनं घेतला गळफास

Love Triangle: एकाच मुलावर जडलं दोन मैत्रिणींचं प्रेम, रात्री भांडणानंतर एकिनं घेतला गळफास

आत्महत्या करण्यापूर्वी कोमल आणि तिच्या मैत्रिणीचा फोनवरूनदेखिल संबंधित तरुणावरून वाद झाला होता. अखेर त्यांच्या वादानंतर तणावात कोमलनं गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी कोमल आणि तिच्या मैत्रिणीचा फोनवरूनदेखिल संबंधित तरुणावरून वाद झाला होता. अखेर त्यांच्या वादानंतर तणावात कोमलनं गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी कोमल आणि तिच्या मैत्रिणीचा फोनवरूनदेखिल संबंधित तरुणावरून वाद झाला होता. अखेर त्यांच्या वादानंतर तणावात कोमलनं गळफास घेत आत्महत्या केली.

नोयडा, 10 जून : मित्र किंवा मैत्रिण हे आपल्या सर्वात जवळचे आणि जीवाभावाचे असतात. आपण कुटुंबीयांशी अगदी सख्ख्या भाऊ बहिणींशी जे शेअर करत नाही, ते मित्र मैत्रिणींशी करतो असंही म्हटलं जातं. पण जेव्हा विषय प्रेमाचा असतो तेव्हा अगदी जवळचा मित्रही शत्रू बनत असतो. असाच काहीसा प्रकार नोयडामध्ये पाहायला (Noida Love Triangle) मिळाला. याठिकाणी दोन मैत्रिणींचं एका तरुणावरून भांडण झालं आणि त्यातून एका तरुणीनं गळफास घेत आत्महत्या (Suicide for love) केल्याचं समोर आलं आहे.

(वाचा-हे काय! पुण्यात कोरोनाकाळात वाढले पुरुषांवरील कौटुंबीक हिंसाचार, समोर आले आकडे)

ही घटना नोयडाच्या सूरजपूर परिसरातील आहे. याठिकाणी एकाच तरुणावर प्रेम असल्याच्या कारणावरून दोन मैत्रिणींमध्ये वाद झाला होता, त्यातून एकिनं आत्महत्या केली. सूरजपूर याठिकाणी राहणाऱ्या कोमलचं एका मुलावर प्रेम होतं. त्याचप्रकारे तिच्या जवळच्या मैत्रिणीचंही एका मुलावर प्रेम होतं. पण जेव्हा या दोघींना कळलं की त्यांचं दोघींचंही प्रेम असलेला तरुण एकच आहे, तेव्हा यावरून वाद सुरू झाला. कोमल आणि तिच्या मैत्रिणीमध्ये वाद झाले.

(वाचा-Crime:शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी तीन वर्षाच्या नातीची आपटून हत्या, असं आलं समोर..)

प्रेमाच्या त्रिकोणातून निर्माण झालेला कोमल आणि तिच्या मैत्रिणीचा वाद हा प्रचंड वाढत गेला. बुधवारी रात्रीदेखिल या दोन मैत्रिणींमध्ये यावरून वाद झाला. त्यानंतर तणावामध्ये कोमलनं बुधवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी कोमल आणि तिच्या मैत्रिणीचा फोनवरूनदेखिल संबंधित तरुणावरून वाद झाला होता. अखेर त्यांच्या वादानंतर तणावात कोमलनं गळफास घेत आत्महत्या केली.

सूरजपूर येथील प्रभारी पोलिस निरीक्षक अजय कुमार यांनी सांगितलं की, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत कोमल आणि तिच्या मैत्रिणीच्या वादाबाबत पोलिस सध्या माहिती घेत आहेत. फोनवरही त्यांच्यात वाद झाले होते, नेमकं काय झालं ते पूर्ण समोर आल्यानंतर याबाबत नेकमी काय कारवाई करायची याचा निर्णय घेणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Suicide, Suicide news