स्टीफन हॉकिंगसारखा होता 'हा' विद्यार्थी; परीक्षेवेळी झाला मृत्यू, 3 विषयात मिळाले पैकीच्य़ा पैकी मार्क

स्टीफन हॉकिंगसारखा होता 'हा' विद्यार्थी; परीक्षेवेळी झाला मृत्यू, 3 विषयात मिळाले पैकीच्य़ा पैकी मार्क

विनायक फक्त 3 विषयांचीच परीक्षा देऊ शकला कारण पुढील परीक्षा देण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 मे : स्टीफन हॉकिंगला आपला आदर्श मानणाऱ्या विनायक श्रीधरने मृत्यूआधी दहावीच्या ज्या 3 विषयांची परीक्षा दिली त्यामध्ये त्याने प्रत्येक विषयात 100 मार्क मिळवले आहेत. दुर्देव म्हणजे विनायक फक्त 3 विषयांचीच परीक्षा देऊ शकला कारण पुढील परीक्षा देण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

विनायकने इंग्रजी विषयामध्ये 100 मार्क मिळवले आहेत. विज्ञानात 96 आणि संस्कृतमध्ये त्याने 97 मार्क मिळवले. कंप्यूटर सायन्स आणि सोशल स्टडीज या विषयाची परीक्षा तो देऊ शकला नाही. 10वीच्या परिक्षेमध्ये टॉप करणं, अंतराळवीर बनणं आणि रामेश्वरच्या यात्रेला जाण्याचं विनायकचं स्वप्न होतं. पण आता ते पूर्ण होऊ शकणार नाही. विनायक जेव्हा 2 वर्षांचा होता तेव्हा त्याला मस्क्यूलर डिस्ट्रॉफी या आजाराने ग्रासलं.

हेही पाहा: VIDEO 'प्रेमाच्या आडून शिव्यांचा मार, काँग्रेसचं हे धोरण चालणार नाही'

मस्क्यूलर डिस्ट्रॉफी हा एक अनुवांशिक आजार आहे. ज्यामध्ये मांसपेशियांची वाढ होत नाही. त्यामुळे शरीर कमकुवत होतं. या आजारामुळे विनायक कमजोर पडला होता. विनायक नॉएडाच्या एमिटी शाळेमध्ये शिकायचा. यावर्षी त्याने 10वीची परीक्षा दिली. पण महान वैज्ञानिक हॉकिंग यांच्यासारखं त्याचं आयुष्य व्हिल चेअरवर सुरू होतं.

विनायकने आयुष्याबद्दल खुप स्वप्न पाहिली होती. त्याला रामेश्वर यात्रेला जायचं होतं. त्याचं हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याचे कुटुंबीय रामेश्वरला गेले आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर ते यात्रेसाठी रवाना झाले. विनायकची स्वप्न खुप मोठी होती. ती पूर्ण करण्याची धमकही त्याच्यामध्ये होती. पण त्याच्या आजाराने त्याला साथ दिली नाही आणि त्यात त्याची सगळी स्वप्न अपूर्ण राहिली.


VIDEO : गुन्हाचा पुणेरी पॅटर्न, तरुणाला बॅटने बेदम झोडपले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 11:11 PM IST

ताज्या बातम्या