नोबेल विजेत्या कैलाश सत्यार्थींचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

नोबेल विजेत्या कैलाश सत्यार्थींचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

कैलाश सत्यार्थी आणि त्यांच्या पत्नी सुमेधा कैलाश यांच्या सन्मानार्थ रविवारी राष्ट्रीय सिनेमा संग्रहालयात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै : जागतिक शांततेसाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित कैलाश सत्यार्थी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कैलाश सत्यार्थी आणि त्यांच्या पत्नी सुमेधा कैलाश यांच्या सन्मानार्थ रविवारी राष्ट्रीय सिनेमा संग्रहालयात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान मुलांच्या अधिकारासाठी केलेल्या कामाबाबत सत्यार्थी यांना 2014 साली नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आता वोक्हार्ट समुहाच्या वतीने सत्यार्थी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी बोलताना सत्यार्थी म्हणाले की, 'विविध अडचणी आणि हल्ल्यांनंतरही मुलांची सुटका करण्यासाठी त्यांच्या अधिकारासाठी आम्ही कधीही लढाई सोडली नाही. कधीही समझोता केला नाही.'

या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उपस्थितांच्या समोर त्यांच्या 'द प्राइस ऑफ फ्री' या लघुपटाचे प्रदर्शनही करण्यात आले. ऑस्कर विजेता चित्रपट निर्माते डेविस गुगेनहेम यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित 'द प्राइस ऑफ फ्री' या लघुपटाला 2018 साली सॉल्ट लेक सिटी येथे झालेल्या सनडान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी पुरस्कार मिळाला होता. तर यावर्षी यूट्यूबवर झालेल्या मोंटे कार्लो चित्रपट महोत्सवात शांती पुरस्कार मिळाला होता.

VIDEO : 'बारामतीत अजित पवारांचं काम जास्त, 2019 ला त्यांना हरवणं फक्त आशावाद'

First published: July 8, 2019, 3:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading