राहुल गांधी नव्हे तर 'या' दोघांची आहे प्रत्येकाला 72 हजार देण्याची आयडिया

राहुल गांधी नव्हे तर 'या' दोघांची आहे प्रत्येकाला 72 हजार देण्याची आयडिया

भारतातील गरीबांना 72 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. खरंतर राहुल गांधी यांना किमान उत्पन्नाची हमी या योजनेची कल्पना कोणी दिली?

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक 2019च्या आधीच एक मोठी घोषणा केली. भारतातील गरीबांना 72 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. खरंतर राहुल गांधी यांना किमान उत्पन्नाची हमी या योजनेची कल्पना कोणी दिली? यामागे कोणाची शक्कल आहे अशी चर्चा सध्या देशभर सुरू आहे.

द प्रिंटने पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून माहिती घेत याचा खुलासा केला आहे. खरंतर ही कल्पाना 2015चे नोबल पुरस्कार विजेता ब्रिटिश अर्थतज्ञ एंगस डीटन आणि फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांची असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अर्थतज्ञांनी दिलेल्या कल्पनेनुसार राहुल गांधी यांनी ही योजना आखली आहे. एका पुस्तकाच्या माध्यमातून राहुल गांधी फ्रेंच अर्थतज्ञांना भेटले.


मिळालेल्या माहितीनुसार, शोधमोहिमेतून काँग्रेस या दोन्ही अर्थतज्ञांपर्यंत पोहचली. खरंतर अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी Capital in the Twenty-First Century या नावाचं पुस्तक लिहलं आहे. त्याच्या माध्यमातून काँग्रेसने त्यांचा शोध घेतला.

या योजनेवर काम करण्यासाठी राहुल गांधी यांनी अनेक लोकांना या कामी लावलं आहे. त्याचवेळी त्यांनी पिकेटी यांचं पुस्तक मिळालं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहचले.


ही योजना फक्त आश्वासन नाही

या योजनेवर काम करण्यासाठी खूप दिवस मेहनत घेण्यात आली आहे. त्यासाठी अनेक दिग्गजांशी बोलणं करण्यात आलं. त्यांची मत घेऊन त्यावर अधिक रिसर्च करून त्यानंतर ही योजन आखण्यात आली आहे. निवडणुका आल्यामुळे मतांच्या पेट्या भरण्यासाठी ही योजना आखण्यात आलेली नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 08:17 AM IST

ताज्या बातम्या