जोडीदाराबरोबर नोबेल शेअर करणारे अभिजीत बॅनर्जी होते JNU चे विद्यार्थी

जोडीदाराबरोबर नोबेल शेअर करणारे अभिजीत बॅनर्जी होते JNU चे विद्यार्थी

गरिबी दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये नवे प्रयोग केल्याबद्दल अभिजीत बॅनर्जी यांना ज्यांच्या बरोबरीनं नोबेल जाहीर झालं त्या इस्थर डफ्लो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही जोडीदार आहेत. या दोघांना एक मुलगाही आहे. 58 वर्षांच्या अभिजीत बॅनर्जीबद्दल या 10 गोष्टी माहिती आहेत का?

  • Share this:

स्टॉकहोम (स्वीडन), 14 ऑक्टोबर : अनेक वर्षांनी नोबेल पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये भारतीय नाव झळकलं आहे. मूळ भारतीय वंशाच्या आणि आता अमेरिकेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या अभिजीत बॅनर्जी (Abhijit Banerjee) यांना अर्थशास्त्राचं नोबेल जाहीर झालं आहे. इस्थर डफ्लो Esther Duflo आणि मायकेल क्रेमर Michael Kremer यांच्यासह अभिजीत बॅनर्जी यांना या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा वेगळा दृष्टिकोन जगाला दिल्याबद्दल या संशोधक त्रयींना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिजीत बॅनर्जी कोण? त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि त्यांच्या संशोधनवृत्तीबद्दल माहीत नसलेल्या 10 गोष्टी.

संबंधित मूळ बातमी : भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

1. जागतिक स्तरावर गरिबी दूर करण्यासाठीच्या उपायांना (global poverty) आपल्या प्रयोगांतून एक वेगळा आयाम दिला. बालकांचं आरोग्य हा विषय गरिबीच्या निर्देशांकात सर्वांत वरच्या स्तरावर आला तो या तिघांनी केलेल्या प्रयोगांमुळे.

2. 58 वर्षीय अभिजीत बॅनर्जी मुळचे भारतीय असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) त्यांनी शिक्षण घेतलं. आता ते अमेरिकेचे नागरिक आहेत आणि Massachusetts Institute of Technology  MIT मध्ये प्राध्यापक आहेत.

3. अभिजीत बॅनर्जी यांनी आपल्या पहिल्या पत्नीला डॉ. अरुंधती तुली बॅनर्जी यांना घटस्फोट दिल्यानंतर ज्यांच्याबरोबर संशोधन करत होते त्या इस्थर डफ्लो यांच्या ते प्रेमात पडले. इस्थर आणि अभिजीत यांना एक मुलगाही झाला. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.

4. अभिजीत बॅनर्जी यांना त्यांची पार्टनर इस्थर डफ्लो यांच्याबरोबर नोबेल जाहीर झालं हे विशेष. डफ्लो यांच्या PhD च्या वेळी अभिजीत त्यांचे सुपरवायजर होते.

5.  इस्थर डफ्लोदेखील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT ) मध्ये प्राध्यापिका आहेत.

6.  अभिजीत बॅनर्जी यांचा जन्म कोलकाता इथे झाला. त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इकॉनॉमिक्सची पदवी घेतली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला.

7.  JNU मधून डिग्री घेतल्यानंतर अभिजीत PhD करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठात दाखल झाले.

8. Poor Economics हे त्यांचं पुस्तक अर्थविषयक अभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहे. अभिजीत बॅनर्जी यांचे आई- वडील निर्मला आणि दीपक बॅनर्जी दोघेही कोलकात्यात अर्थशास्त्राचे प्रोफेसर होते.

9.  2014 मध्ये मेरी ब्रिट मोझर आणि पती एडवर्ड मोझर या नॉर्वेच्या संशोधक जोडीला औषधशास्त्राचं नोबेल मिळालं होतं.

10. जोडीने नोबेल मिळवणारी पहिलं शास्त्रज्ञ दांपत्य मादाम मेरी क्युरी आणि पेरी क्युरी हे आहे. स्वीडनच्या सोशॉलॉजिस्ट आणि राजकारणी अल्वा मिरडाल यांना 1982 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि त्यांचा पती ग्युनर मिरडाल यांना 1972 मध्येच अर्थशास्त्राचा पुरस्कार मिळाला होता.

--------------------------------------

हेही वाचा -

PMC बँक घोटाळा:दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाला जुनैद खान, बायकोला दिले 9 फ्लॅट्स

'मूंछ नहीं, तो कुछ नहीं' निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांच 'मिशी'वरून भांडण

गेल्या 5 वर्षांत फडणवीसांनी कोणता प्रकल्प पूर्ण केला? चव्हाणांचा थेट सवाल

तिरंग्याची शान वाढली, भारत जगातील टॉप टेन 'ब्रँड व्हॅल्यू' असलेल्या देशांमध्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या