'पंतप्रधानांनीच सांगितलं, माध्यमं कशी तुम्हाला मोदीविरोधात बोलण्यास भाग पाडतात'

'पंतप्रधानांनीच सांगितलं, माध्यमं कशी तुम्हाला मोदीविरोधात बोलण्यास भाग पाडतात'

अर्थशास्त्रातल्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जिंकणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बातचीत केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर :  अर्थशास्त्रातल्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जिंकणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी (22 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बातचीत केली. मोदींबरोबर अनेक गोष्टींवर चांगली चर्चा झाल्याची प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. "पंतप्रधानांनी बराच वेळ मला दिला, त्याबद्दल मला आनंद आहे.

प्रशासनाचा विचार ते कशा पद्धतीने करतात ते त्यांनी स्पष्ट केलं. नोकरशाही सुधारण्यासाठी ते काय प्रयत्न करत आहेत, हे त्यांनी सांगितलं", असं बॅनर्जी म्हणाले. पत्रकारांनी या भेटीविषयी आणि त्यांच्या मोदीविरोधी विचारसरणीबद्दल विचारल्यावर बॅनर्जी यांनी तातडीने याविषयी अधिक प्रश्न नको असं सांगत स्पष्ट केलं की, "पंतप्रधानांनी याविषयी विनोदाने मला सांगितलंही आहे की, माध्यम प्रतिनिधी तुम्हाला मोदीविरोधी बोलण्यास भाग पाडतील. "

पंतप्रधान मोदींनी बॅनर्जी यांच्या भेटीसंदर्भात ट्वीट करून माहिती दिली.

संबंधित - जोडीदाराबरोबर नोबेल शेअर करणारे अभिजीत बॅनर्जी होते JNU चे विद्यार्थी

"नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना भेटून छान वाटलं. मानवतेच्या कल्याणासाठी, सबलीकरणासाठी त्यांची पॅशन स्पष्ट दिसते. अनेक विषयांवर आम्ही सखोल आणि चांगली चर्चा केली. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल भारताला अभिमान आहे", असं मोदींनी लिहिलं आहे.

58 वर्षीय अभिजीत बॅनर्जी मुळचे भारतीय असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) त्यांनी शिक्षण घेतलं. आता ते अमेरिकेचे नागरिक आहेत आणि Massachusetts Institute of Technology  MIT मध्ये प्राध्यापक आहेत. अमेरिकेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या अभिजीत बॅनर्जी (Abhijit Banerjee) यांना अर्थशास्त्राचं नोबेल जाहीर झालं. इस्थर डफ्लो Esther Duflo आणि मायकेल क्रेमर Michael Kremer यांच्यासह अभिजीत बॅनर्जी यांना या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. गरिबी कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा वेगळा दृष्टिकोन जगाला दिल्याबद्दल या संशोधक त्रयींना नोबेल पुरस्कार मिळाला.

अन्य बातम्या :

Infosysला सर्वात मोठा झटका; काही मिनिटातच 45 हजार कोटी बुडाले!

तुमच्या चेहऱ्यात असतील 'या' गोष्टी तर मिळतील 92 लाख रुपये!

'राष्ट्रवादी सोबत असताना शत्रूची गरज नाही', काँग्रेस नेत्याचा घणाघाती हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 04:50 PM IST

ताज्या बातम्या