'भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी', अर्थशास्त्राचे नोबेल विजेत्या बॅनर्जींनी टोचले मोदी सरकारचे कान

जागतिक मंदीतून भारताला सावरू असं महाराष्ट्रातील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. यातून त्यांनीही देशात मंदी असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 08:44 AM IST

'भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी', अर्थशास्त्राचे नोबेल विजेत्या बॅनर्जींनी टोचले मोदी सरकारचे कान

न्यूयार्क, 15 ऑक्टोबर : अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे अमेरिकन अभिजित बॅनर्जी यांनी सोमवारी मोदी सरकारच्या अर्थव्यवस्थाविषयक धोरणांवर टीका केली. सरकाकडून अर्थव्यवस्थेसमोरच्या अडचणी ओळखण्याऐवजी खराब कामगिरी केली जात असल्याचं अभिजित बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत झाल्याचं मत अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणि भविष्याबद्दल विचारले असता बॅनर्जी म्हणाले की, भविष्यात काय होईल याबद्दल माझं मत नाही पण जे आता सुरू आहे त्याबद्दल आहे. यावर माझं मत मांडण्याचा अधिकार मला आहे. 2014-15 च्या तुलनेत 2017-18 मध्ये अर्थव्यवस्था कमकुवत झाली असल्याचं बॅनर्जींनी सांगितलं. गेल्या पाच ते सहा वर्षांत अर्थव्यवस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र आता तसं चित्र नाही. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नसल्याचंही बॅनर्जी म्हणाले.

नुकतंच महाराष्ट्रात झालेल्या एका सभेत पंतप्रधान मोदींनी जागितक मंदीतून भारताला सावरणार असं म्हणत अप्रत्यक्ष देशात मंदी असल्याचंच कबूल केलं होतं. बॅनर्जी म्हणाले की, 'गेल्या काही वर्षांमध्ये असं पहिल्यांदा झालं असेल तर अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा आहे.' सध्या मंदी आहे की नाही, अर्थव्यवस्थेबद्दल जाहीर होणारी कोणती आकडेवारी योग्य यावर मतमतांतरे आहेत. बॅनर्जींनी सांगितलं की, सरकारसुद्धा आता मान्य करत आहे की काहीतरी अडचण आहे. अर्थव्यवस्था वेगानं मंदीकडे वाटचाल करत आहे. किती वेगानं ते माहिती नाही. त्याच्या आकडेवारीवरून वाद आहे. पण मला वाटतं की खूप वेगानं.

वाचा : जोडीदाराबरोबर नोबेल शेअर करणारे अभिजीत बॅनर्जी होते JNU चे विद्यार्थी

मूळ भारतीय वंशाच्या आणि आता अमेरिकेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या अभिजीत बॅनर्जी (Abhijit Banerjee) यांना अर्थशास्त्राचं नोबेल जाहीर झालं आहे. इस्थर डफ्लो Esther Duflo आणि मायकेल क्रेमर Michael Kremer यांच्यासह अभिजीत बॅनर्जी यांना या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा वेगळा दृष्टिकोन जगाला दिल्याबद्दल या संशोधक त्रयींना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

Loading...

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 08:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...